Bluepad | Bluepad
Bluepad
वनप्लस ‘नॉर्ड’ – आकर्षक आणि उत्तम फोन
Saurabh Zemse
Saurabh Zemse
9th Sep, 2020

Share


वनप्लसने त्यांच्या मिड टायर सेग्मेंट मधील ‘नॉर्ड’ ह्या फोनची घोषणा जून महिन्यात केली होती तेंव्हापासून माझ्या प्रमाणे असंख्य लोक ह्या फोनची बाजारात येण्याची वाट पहात होते आणि शेवटी त्याचं आगमन झालंच. त्या फोनचे फीचर्स संगितले गेले तेंव्हाच त्याच्या विषयीची उत्सुकता ताणली गेली होती आणि तो अपेक्षेप्रमाणेच अनेक आकर्षणे घेऊन आला. त्याच्या लूकमुळे मी पहिल्या नजरेतच त्याच्याकडे आकृष्ट झाले. गडद आकाशी रंग आणि जणू काचेचा असावा असा फील. एवढं माझ्यासाठी पुरेसं होतं, तरीही मी त्याचे इतर सर्व फीचर्स पहिले आणि मग त्याला मी माझ्या शिरपेचात रोवला. त्याचे ते फीचर्स मी आज तुम्हाला सांगणार आहे.

वनप्लस ‘नॉर्ड’ – आकर्षक आणि उत्तम फोन

वनप्लसचे जेवढे फोन आजवर आले त्यांची बॉडी ही धातूची होती पण ‘नॉर्ड’ची बॉडी प्लॅस्टिकची आहे. फक्त त्याला प्लॅस्टिकचे थोडे जास्त थराचे फिनिशिंग दिल्यामुळे त्याला काचेचा फील आला आहे ज्यामुळे फोनला एक रिच फील मिळतो. याचा २४०० x १८०० पिक्सेलचा डिसप्ले मला खूप आवडला. याची ६.४४ इंचाची स्क्रीन ९० हर्ड्ज स्पीडमुळे नजाकतीने चालते आणि त्यामुळे ती अगदी सहज वापरता येते. तुम्हाला हवं असल्यास याचा स्पीड ६० हर्ड्ज पर्यन्त करू शकता, त्यामुळे तुमची बॅटरी जास्त टिकू शकते.
वनप्लस ‘नॉर्ड’च्या सिम ट्रेमध्ये २ नॅनो सिम कार्ड्स लागू शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे हा फोन 5जी सेवा देण्यासाठी बनवला गेला आहे. त्यामुळे जेंव्हा 5जी सेवा येईल तेंव्हा तुमच्याकडे आधीच त्याचा डिवाइस असणार आहे. हो, तोपर्यंत तुम्ही यात 4जी सेवा वापरू शकता. सिम ट्रेच्या बाजूलाच ‘टाइप सी’चा यूएसबी पोर्ट आणि स्पीकर आहे. यासोबतच ५.१चा ब्लुटूथ आणि ड्युअल बॅंडचा वायफाय आहे ज्यामुळे तुम्हाला उत्तम अशी इंटरनेट सेवा मिळू शकते.
वनप्लस ‘नॉर्ड’ तीन वेगवेगळे पर्याय देतो. एक ८ जीबी सोबत ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देतो, दुसरा ८ जीबी सोबत १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देतो आणि तिसरा १२ जीबी सोबत २५६ जीबी इंटरनल स्टोरेज देतो. तुमची गरज आणि तुमचा खिसा तुम्हाला परवानगी देईल तसा पर्याय तुम्ही निवडू शकता. वनप्लस ‘नॉर्ड’ २५ हजारापासून ३० हजारा पर्यन्त उपलब्ध आहे. माझ्यासाठी ८ जीबी सोबत १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा फोन योग्य होता.
आता याच्या कॅमेर्‍याविषयी बोलूयात. यात क्वाड कॅमेरा सेटअप असून ४८ मेगा पिक्सेलचा सोनी आयएमएक्स 586 चा प्रायमरी सेंसर यात आहे. याच्या अल्ट्रा वाइड कोनाची लेन्स ८ मेगा पिक्सेल, डेप्थ शूटर ५ एमपीची आणि मॅक्रो लेन्स २ एमपीची आहे. विडियोसाठी अल्ट्रा शॉट एचडीआर, नाइटस्केप, सुपर मॅक्रो सोबत रॉ इमेज, फिल्टर्स आणि क्वीक शेअर असे पर्याय सुद्धा आहेत.
अर्थात यानंतर पाळी आहे आपल्या आवडत्या फ्रंट कॅमेर्‍याची. यात ३२ एमपी मेन सेंसर सोबत ८ एमपी अल्ट्रावाइड लेन्स आहे. यासोबत फ़ेस अनलॉक, एचडीआर स्क्रीन फ्लॅश, फ़ेस रीटचिंग, फिल्टर्स आणि अल्ट्रावाइड सेल्फी हे पर्याय यात आहेत.
वनप्लस ‘नॉर्ड’ याचा मुख्य फीचर आहे याचा यूजर इंटरफ़ेस. हा अँड्रोइड १० च्या ऑक्सिजन ओएस वर चालतो आणि आजवरच्या अँड्रोइड फोनचा सर्वोत्कृष्ट यूजर इंटरफेस म्हणून तो सिद्ध ही झाला आहे. याचा चार्जिंग स्पीड ३० वॅट्स आहे. आजच्या १२० वॅट्सच्या जमान्यात हा जरा अगदीच कमी वाटेल. पण चांगल्या रिझल्टसाठी थोडी वाट पहावी तर लागतेच ना! आणि इतक्या चांगल्या रिझल्टसाठी मी तरी वाट पाहायला तयार आहे. माझ्या प्रमाणेच वनप्लस ‘नॉर्ड’ तुमच्यासाठी एक चांगला फोन सिद्ध होऊ शकतो.

18 

Share


Saurabh Zemse
Written by
Saurabh Zemse

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad