Bluepadमुखवटा.....
Bluepad

मुखवटा.....

डॉ अमित.
डॉ अमित.
9th Sep, 2020

Share


मुखवटा.....


मुखवटा रोज चढतो हल्ली
पहा कसा चेहऱ्यावर नवनवीन
माणसे कुठे भेटतात आजकाल
भेटतात फक्त मुखवटे चेहरे बदलून...


ज्याला मानले आपले
होतो केंव्हातरी परक्याच्या स्वाधीन
हेतू भेटले असतात मनातले
भावनांच्या आड हलकेच दडून


सोबती खरा तुमचा
नाही दुसरा तिसरा व्यक्ती कोण
स्वतःवर प्रेम करा आधी तुम्ही
खंबीर ठेवा नेहमी तुम्ही तुमचे मन


मग भले बदलू कोणी कितीही
मुखवटे रोज खोटे खोटे हसून
भेटेल त्यास मात्र खरा चेहरा
जो दाखवेल आरसा त्यास आवर्जून


मी ही ठरवले आज मुद्दाम
नाही भेटायचे कुणा मुखवट्या आडून
सामोरे जायचे प्रत्येकास आता
खुद्द स्वतःशी अगदी प्रामाणिक राहून...


डॉ अमित.

19 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad