Bluepadकर्मधर्म संयोग.....एक आंतरिक शक्ती वृद्धिंगत करणारा योग.
Bluepad

कर्मधर्म संयोग.....एक आंतरिक शक्ती वृद्धिंगत करणारा योग.

डॉ अमित.
डॉ अमित.
7th Sep, 2020

Share


कर्मधर्म संयोग.....एक आंतरिक शक्ती वृद्धिंगत करणारा योग.


सहजच एक सुंदर विचार काल वाचण्यात आला.

"तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला जे जे हवे ते देवाला मागत राहावे लागेल पण तुम्ही कर्म कराल तर तुम्हाला जे जे हवे ते देवाला तुम्हाला द्यावे लागेल".

खरंच किती सुंदर आणि अंतर्मुख करायला लावणारा विचार आहे.
पण याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तुम्ही धर्म करू नका किंवा देवाला मानू नका...कारण

'कर्म-धर्म' संयोगाने मिळणाऱ्या फळाची गोडी ही आणखीनच अवीट असते,काही औरच असते.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

भगवद गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला हा उपदेश आपल्या रोजच्या जगण्याचा सार आहे.

अर्थात तेरा कर्म करने में ही अधिकार है, उसके फलों में कभी नहीं। इसलिए तू फल की दृष्टि से कर्म मत कर और न ही ऐसा सोच की फल की आशा के बिना कर्म क्यों करूं!

आपले काम फळाची अपेक्षा न करता मनापासून करत राहणं जस गरजेचं आहे तसचं फळं मिळणार नसेल तर कर्म कशासाठी करायचं असा विचार करत काहीही न करणं हे देखील चुकीचं आहे.

एखाद्या चांगल्या कामाचा गणेशाला वंदन करून "श्रीगणेशा" आपण जेंव्हा करतो....ते करत असताना साईंची "श्रध्दा व सबुरी" ची कास धरून स्वामींचा "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हा विश्वास मनात बाळगून आपण मनापासून जेंव्हा ते काम करतो तेंव्हा आपल्या कामास नक्कीच उत्तम फलश्रुती प्राप्त होते.....
आपल्या धर्मात हे जे ' आशिर्वचन ' प्रचलित आहेत ते खरंच आपली आंतरिक शक्ती,मनाची शक्ती नक्कीच वृद्धिंगत करतात.
जेंव्हा आपण श्री गणेशा करतो,एखाद्या कामाला गणेशाला वंदन करून जेंव्हा सुरुवात करतो तेंव्हा एका सकारात्मक ऊर्जेने आपण प्रेरित होत असतो.ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला ते काम करताना नक्कीच पदोपदी उपयोगी पडते.कधी कधी काम होत असताना काही अनपेक्षित अडचणी येतात,कधी कधी कामाला उशीर होतो अश्या वेळेस साईंचा श्रध्दा व सबुरीचा संदेश आपली चिकाटी आणि सहनशक्ती वाढविण्यास मदत करते...इतकं होत असताना काही विपरीत जरी घडले तरी स्वामींचा
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास आपल्याला कमजोर पडू देत नाही.आपल्याला निःशंक पणे ते काम अविरत, अखंड चालू ठेवण्यास उत्साहित करतो....

धर्म अश्या प्रकारे आपले आंतरिक मनोबल उंचावण्यास उपयोगी पडतो.....शेवटी हे आंतरिक मनोबल,मनाचा दृढ निश्चय आणि मनाची प्रबळ इच्छाशक्ती आपले कोणतेही काम यशस्वी करते....हे यश मग आपोआपच फलप्राप्ती करून देते...

असा हा कर्म धर्म संयोग मी म्हणेन एक असा योग आहे जो आपल्याला आपले आयुष्य सुंदर आणि परिपूर्ण करण्यास नक्कीच मदत करतो.


आठवतो मज माझा हा
आतापर्यंतचा आयुष्याचा प्रवास
पदोपदी मी अनुभवला जणू
कर्मधर्म संयोगाचा अनुभव खास

मला वाटतं हा फक्त माझ्या एकटयाचाचं अनुभवं नसावा...आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण प्रत्येकाने हा अनुभवं घेतलेला असतो,जगलेला असतो.

शेवटी हे आयुष्य जगताना "जो जिता वो ही सिकंदर" तर असतोच पण जिंकण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न हेही तितकेच महत्वाचे कदाचित त्याहून अधिक महत्त्वाचे असतात...

उडता रहुंगा मै आकाश में
बिना काले बादलों की परवा किये
छू लूंगा आसमन को एक दिन
अपने मेहनत और लगन पर स्वार हुये


तेंव्हा अशी ही कर्मधर्म संयोगाची ही सांगड यशाचा अवघडात अवघड गड सर करायला आपल्याला नक्कीच मदत करेल....तुम्हाला काय वाटतंय बरोबर सांगतोय ना मी?

डॉ अमित.
18 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad