Bluepadजल हैं तो कल हैं.....
Bluepad

जल हैं तो कल हैं.....

डॉ अमित.
डॉ अमित.
7th Sep, 2020

Share


जल हैं तो कल हैं.....


मागील काही वर्षांपासून "पाणी फाऊंडेशन" संपूर्ण महाराष्टातील खेडोपाड्यात श्रमदान शिबीर आयोजित करत होते.त्याला संपूर्ण महाराष्टातील जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
मागील वर्षी एक मे महाराष्ट्र दिन रोजी हे श्रमदान शिबिरात जाण्याचा योग आवर्जून आणला.त्यावेळी आलेला अनुभव या लेखातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या लेखातून मी केला आहे.

दिवस.. १ मे महाराष्ट्र दिन.
पाणी फाऊंडेशन अंतर्गत आयोजित श्रमदान शिबिर. स्थळ.. बार्शी जवळचे सुर्डी हे गाव.
तेथे जाण्याचा हा पहिलाच प्रसंग.
'जलमित्र' ही संकल्पना पाणी फाऊंडेशन यांचीच.
किती समर्पक असे नाव.तसे तुलनेने अनोळख्या गावी हजारोंच्या संख्येने,मनात उदात्त हेतू घेवून आपल्याला जमेल झेपेल आणि आवडेल तेवढे श्रमदान करून काळ्या आईची सेवा करण्याची मिळालेली ही सुवर्ण संधी. ही संधी साधण्यासाठी एकत्र आलेले सारे म्हणजेच जलमित्र. तसे हे माझे श्रमदानाचे दुसरे वर्ष आणि तिसरी वेळ.
मागील वर्षी दोन ठिकाणी आणि या वर्षी च हे पहिलेच ठिकाण.

"पाणी अडवा पाणी जिरवा" ही मूळ संकल्पना.कमी होत चाललेली भूजल पातळी उंचावण्यासाठी पाण्याचे जमिनीत जिरवणे हा हेतू.

मध्यंतरी एक खूप छान वाक्य वाचण्यात आले.
पेट्रोल डिझेल गॅस ऑईल इत्यादींचा टँकर कधीच गळका नसतो मात्र फक्त पाण्याच्याच टँकर गळका का?
पाणी तर अमूल्य आहे हो की नाही?
खूप विचार करण्या सारखं वाक्य होतं.हो फक्त विचार करून भागणार नाही कृतीही तितकीच किंबहुना त्याहून जास्त महत्वाची आहे.आहे ते पाणी काटकसरीने आणि योग्य तऱ्हेने वापरणे गरजेचे आहे.
बोअर घेतानाच बोअर रिचार्ज प्लॅन्ट तयार करणे म्हणजे पावसाचे पाणी जमिनीत मुरत राहील अशी योजना करणे.घरातील सांडपाण्यासाठी पुनर्वापर प्लॅन्ट बसवणे.
रेन वॉटर हा्वेस्टिंग करणे.वृक्ष तोड थांबविणे आणि नव्या वृक्षांची लागवड करणे.


पाणी हेच जीवन आणि
पाणी म्हणजेच जीवनरस
थेंब थेंब याचा अमूल्य
पाण्याअभावी जीवन आहे नीरस


हे पाणी जर आपल्याला वाचवायचे असेल तर खूप झाडे लावली नि जगवली पाहिजेत.
मला तर वाटतयं की प्रत्येक घरात मुलं जन्माला आले की पालकाने एक झाड अवश्य लावावे आणि जगवावे.तरच त्याला मुलाच्या जन्माचा दाखला मिळेल.त्याने ते झाडं मुलं पहिलीत जाईपर्यंत वाढविले की त्याला शाळेत प्रवेश मिळेल आणि दहावी पर्यंत पूर्ण वाढविले की त्याला दहावीला बोनस गुण मिळतील.
माणसाच्या शरीराचा ६० ते ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे.साधारणतः त्यातील दहा टक्के पेक्षा जास्त शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की माणसाचा मृत्यू होवू शकतो.माणूस अन्नाशिवाय जास्त दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय नाही.
पावसाचे वरवर कमी होत चाललेले प्रमाण आगामी दुष्काळाची नांदी आहे.याच दुष्काळाला सुकाळ आणि आपल्या धरतीला सुजलाम सुफलाम करायचे असेल तर पाण्याचे महत्व जाणले पाहिजे,त्याला जीवापाड जपले पाहिजे.

जल हैं तो कल है...
संदेश ये कितना अनमोल हैं
चलो मिलके इसे बचायेंगे
फिर सबका भविष्य उज्वल हैं.

पाणी फाऊंडेशन ने गेले काही वर्षे केलेल्या या उपक्रमाचे दूरगामी फायदे आता दिसून येत आहेत..या वर्षी बऱ्याच कोरड्या पडलेल्या बोअर वेल आणि विहिरी पाण्याने काठोकाठ भरलेल्या दिसू लागल्या.थोड्या फार फरकाने जेथे जेथे श्रमदानाचे काम झाले त्या ठिकाणी जमिनीतील पाण्याची पातळी बरीच वाढल्याचे निदर्शनात आले.
तेंव्हा प्रत्येकाने अगदी मनापासून पाण्या साठी हा पण घेणे खूप गरजेचे आहे की "मी शक्य तितके पाणी जपून वापरीन आणि हे ' अमृततुल्य ' पाण्याचे योग्य नियोजन करून भूजल पातळी वाढवण्याचा शक्य तितका प्रयत्न माझ्या परीने मी करेन"...
कारण शेवटी जल हैं तो कल हैं......हो की नाही?
डॉ अमित.

16 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad