Bluepadगहिवरले.... नात्यातले क्षणं सारे
Bluepad

गहिवरले.... नात्यातले क्षणं सारे

डॉ अमित.
डॉ अमित.
6th Sep, 2020

Share

गहिवरले.... नात्यातले क्षणंआठवते मज राहून राहून
भूतकाळातील नाते आपले
बंध होते रेशमाचे ते नाजूक
सांग मला कुठे माझे चुकले


दिले तुला मी ते सारे काही
तुजसाठी माझे सर्वस्व वाहिले
भले कमी पडलो असेल कितीदा
सांग मला कुठे माझे चुकले


नेहमी तुझे मन मी जपले
तू मला कदापि न मानले आपले
मौन तुझे चिरते हे काळीज
सांग मला कुठे माझे चुकले


अंतरात नाही पण ठेवले अंतर
का जाणून बुजून तू दूरचं ठेवले
शरीर कमी पडले मन नाही
सांग मला कुठे माझे चुकले


पुरे झाली शिक्षा इतकी ही
नको पाहू अंत आता मन थकले
या देहाला शाप होता कदाचित
सांग मला कुठे माझे चुकले


जवळ राहूनही दूरचं राहिलीस
उसवल्या वीणेचे नाते हे गुंफले
घे हात माझा पुन्हा तुझ्या हातात
विसरुन जा जे जे माझे चुकले....


चल पुन्हा नव्याने हे उजळू नाते
खुलवू येणारे सारे क्षणं त्यातले
या जीवनाचे सार्थक तेंव्हाच होईल
माफी देता जे होते माझे चुकले...


डॉ अमित.


15 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad