Bluepad | Bluepad
Bluepad
साद निसर्गाची.....
डॉ अमित.
डॉ अमित.
5th Sep, 2020

Share

साद निसर्गाची.... आज कळी मला म्हणाली.... माझ्या संगे फुलतोस का इतक्यात गुमसुम दिसतोयस खरेच काही बिनसले का आकाशाची निळी नवलाई हळूच कुजबुजली कानात नको दडवू शल्य कुठलेही हो मोकळा सांगून तू क्षणात सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान उधळत होती रंग किती छान देऊ पाहत होती आयुष्याला माझ्या नव्या रंगसंगतीचे नवे परिमाण हिरवाईचे निसर्ग सभोवती चे मला खुणवत होते राहून राहून दूर कर मळवट उदासीचे तू घे जगून आयुष्य पुन्हा मनापासून असे कित्येक क्षण देतो आनंदाचे निसर्ग हे आयुष्य उलगडताना त्यास तुलाही साद द्यावी लागेल हे जीवन भरभरून जगताना.... डॉ अमित.

16 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad