Bluepad | Bluepad
Bluepad
जागतिक नारळ दिवस.... एक मानाचा मुजरा कल्पवृक्षाला.
डॉ अमित.
डॉ अमित.
2nd Sep, 2020

Share

जागतिक नारळ दिवस.... एक मानाचा मुजरा कल्पवृक्षाला. २ सप्टेंबर....आज जागतिक कोकोनट दिन... खरे सांगायचे तर... आजचा हा दिवस जागतिक कोकोनट दिवस असतो आज सकाळी मला पहिल्यांदाच कळले... तसे पाहिले तर आपला आणि नारळाचा संबंध आपल्या जन्मापासूनच येतो असे म्हणायला हरकत नाही...जेंव्हा बाळ जन्म घेते आपल्या संस्कृती मध्ये बाळास तेलाने मालिश करणे ही खूप जुनी परंपरा आहे...या तेलात प्रामुख्याने शुध्द खोबरेल तेल आजही वापरले जाते..बालरोग तज्ञ असल्या कारणाने...या मालिश चे विशेष महत्व मी नक्कीच जाणतो आणि आधुनिक शास्त्राने देखील ते मान्य केले आहे.. नारळाचा वापर कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या रोजच्या जीवनात झाला नाही असा एकही दिवस मला वाटतं अगदी विरळचं... नारळाच्या झाडाच्या एक ना एक अवयवांचा वापर कोणत्या ना कोणत्या रूपात होतोच...म्हणूनच नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' असेही म्हणतात... आपल्या हिंदू संस्कृती मध्ये पूजेत,धार्मिक कार्यात तर नारळाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे.म्हणूनच नारळाला 'श्रीफळ ' असेही म्हणतात... शुभ प्रसंगी...नारळ जेंव्हा आपण फोडतो तेंव्हा त्याचे वरचे कठीण कवच फोडून आपण कामात येणाऱ्या कठीण अडचणीचं फोडून दूर करतो असे त्यामागचे त्याचे मर्म आहे. अशी एक आख्यायिका आहे की जेंव्हा भगवान विष्णु यांनी पृथ्वीवर जन्म घेतला तेंव्हा त्यांच्या सोबत लक्ष्मी,नारळाचे झाड आणि कामधेनू अश्या तीनच गोष्टी होत्या.नारळ हे ब्रह्मा विष्णु आणि महेश यांचे प्रतीक आहे..नारळाचे तीन डोळे शंकराच्या 'त्रिनेत्रा' चे प्रतीक मानले जातात... आपल्या, केसा पासून तळव्या पर्यंत नि.... खाण्या पासून पिण्या पर्यंत... खेळण्यां पासून औषधा पर्यंत, शक्ती पासून... भक्ती पर्यंत. नारळ आपली कोणत्या ना कोणत्या रूपात सोबत करत असते....अश्या प्रकारे जन्मा पासून मृत्यू पर्यंत को.. णत्या ना को..णत्या रूपात...एखाद्या पडद्या वरील नटा प्रमाणे आपल्या सोबत नारळ असते...म्हणून तर त्याला को..को..नट.म्हणत नसतील ना?😀😀असा आपला माझा... खोबर्या सारखा गोड समज.. ओला नारळ ज्याला शहाळं असेही म्हणतात औषधी शास्त्रानुसार त्यात पोटॅशियम, मँगॅनीज आणि असे बरेचं क्षार असतात जे तुमची शारीरिक दुर्बलता कमी करतात... खवय्येगिरी करणाऱ्यांसाठी नारळ हा एक महत्वाचा खाद्य घटक आहे...बऱ्याच खाद्य पदार्थांची चव द्विगुणित करण्याचे काम नारळाचा चव करत असतो.... नारळाला नराची उपमा दिली आहे...प्राचीन काळी नरबळी ही प्रथा होती...आपल्या ऋषी मुनींनी नरबळी ला...विरोध करत नारळ ज्याला डोकं,डोळे, खोबरं म्हणजे मांसल भाग आणि करवटी म्हणजे कवटी..असे नरबळी ला प्रतीकात्मक...नारळ फोडण्याची प्रथा पाडली...अशी दंतकथा माझ्या वाचण्यात आली होती...म्हणून अमावस्येला प्रतीकात्मक नारळ फोडतात अशी आख्यायिका आहे... नाही विरळ असा नारळ... आहे एक बहुपयोगी फळ देवालाही प्रिय असे हे श्रीफळ औषधी गुण दडलेत ज्यात पुष्कळ. तर मित्रांनो...असा थोडासा नारळा सारखा...बाहेरून कडक नि आतून गोड असा छोटासा लेख लिहिण्याचा माझा आजचा प्रयत्न.... बाराही महिने असे श्रीफळ देणाऱ्या या महान कल्पवृक्षाला आजच्या या दिनी... माझा मानाचा मुजरा. डॉ अमित.

20 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad