Bluepadबच्चा पार्टी....कथा उमलणाऱ्या फुलांसाठी.
Bluepad

बच्चा पार्टी....कथा उमलणाऱ्या फुलांसाठी.

डॉ अमित.
डॉ अमित.
29th Nov, 2021

Share

आजपासून मी आपल्या छोट्या दोस्तांसाठी वेगवेगळ्या आणि नावीन्यपूर्ण तसेच प्रेरणादायी कथा लिहिण्यास सुरुवात केली आहे. त्या सदराचे नाव आहे बच्चा पार्टी....कथा उमलणाऱ्या फुलांसाठी. तुम्ही या कथा नक्की आपल्या लाडक्या मुलांना वाचावयास द्या आणि ती कथा त्यांना कशी वाटली ते त्यांच्या लाडक्या अमित काकांना कळवावयास सांगा.कारण त्यांचा अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.हा अभिप्रायच मला आणखी चांगल्या चांगल्या कथा लिहिण्यास प्रेरित करेल. आजची कथा..... शौर्य.....आणि त्याची आजी. आजीसाठी त्याचे नातवंड म्हणजे दुधावरची साय. हे नातचं वेगळं असतं.हो असचं आगळवेगळं नातं होतं शौर्य आणि त्याच्या आजी मधले.ऐकायची आहे ना तुम्हाला ही गोष्ट?चला तर मग. शौर्य एक हुशार चुणचुणीत मुलगा.हो त्याची आजी ही देखील खूप मायाळू.शौर्य ची आजी त्याला रोज न चुकता रात्री झोपताना छान छान गोष्टी सांगायची.त्या गोष्टींचा खजिना इतका वैविध्यपूर्ण होता की रोज वेगवेगळ्या गोष्टी ऐकताना शौर्य आपले भान हरपून जात होता.कधी त्या गोष्टीत ऐतिहासिक पात्रे असतं तर कधी जादुई नगरी.कधी राजे महाराजे तर कधी पर्या तर कधी देव दानव.अश्या वेग वेगळ्या गोष्टींनी त्याच्या ज्ञानात आणखीनच भर पडत होती. शोर्य ला आपल्या आजीचे खूप कौतुक वाटे.त्याला वाटे आपली आजी जवळ गोष्टीची पोटलीच आहे जी ती रोज फक्त आपल्यासाठी रिकामी करते. सर्व काही सुरळीत चालले असताना अचानक एकदा शोर्यची आजी आजारी पडली.तिला खूप ताप आला.त्यामुळे ती थकून गेली.तिला बोलण्याचे सुद्धा अवसान राहिले नव्हते. आजीला असे पाहून शौर्य सुरुवातीला थोडे घाबरला.तो आजीच्या जवळ जावून रडूच लागला. आजीने मायेने त्याला जवळ घेतले.थोपटले तेंव्हा कुठे तो शांत झाला.मग मात्र तो मोठ्या धीराने आजीची सेवा करू लागला.तो तिला आधार देवून उठवून बसवू लागला.तिचे हात पाय दाबून देवू लागला.तिचा ताप लवकर उतरावा म्हणून तिच्या कपाळावर ओल्या पट्ट्या ठेवू लागला.डॉक्टर नी दिलेली औषधे तिला वेळच्या वेळी देवू लागला.तिला आपल्या छोट्या छोट्या हाताने भरवू लागला.आजी च्या गोष्टीत त्याने वेळोवेळी ऐकलेल्या थोरामोठ्यांचे वागणे लक्षात ठेवून तो ते रोजच्या जीवनात अमलात आणू लागला.आजीला त्याचे भारी कौतुक वाटले. रोज संध्याकाळी आजीला घेवून जवळच्या बागेत फेरफटका मारायला जावू लागला.बागेत असलेली सुंदर सुंदर रंगीबेरंगी झाडे फुले आणि इतर बच्चे कंपनी पाहता पाहता शोर्य ची आजी लवकरच ठणठणीत बरी झाली.शौर्यला खूप खूप आनंद झाला आणि हो तुम्हाला माहिती का आजारपणात शौर्यच रोज पेपर मध्ये वाचलेली किंवा पुस्तकात वाचलेली गोष्ट आजीला सांगत होता.त्या गोष्टीत स्वतःची भर टाकून ती गोष्ट अधिक रंजक करून सांगू लागला.आजी पण मन लावून त्याच्या गोड गोड आवाजात ती गोष्ट ऐकत होती.असे हे शौर्य चे आणि त्याच्या आजीचे प्रेमळ नाते बच्चे लोक तुम्हाला हेच सांगून जाते की सुख सोबत दुःखात देखील तुम्ही एकत्र असाल तर तुमचे नाते अधिक मजबूत होते आणि तुमच्यातील प्रेम आणखी वृद्धिंगत होते. हो की नाही? कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? तुम्हालाही तुमच्या आजीची आठवण आली की नाही गोष्ट ऐकून?तुम्हीही तुमच्या आजीवर असेच प्रेम करा आणि तिला आपल्या आजी असण्याचा अभिमान वाटू द्या?कारण म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असते. ऐकाल ना माझं हे सांगणं? चला तर मग पुन्हा भेटू नवीन नवीन गोष्टीसह. डॉ अमित.

14 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad