Bluepadवाऱ्यावरती स्वार होऊनी.....
Bluepad

वाऱ्यावरती स्वार होऊनी.....

डॉ अमित.
डॉ अमित.
1st Sep, 2020

Share


वाऱ्यावरती स्वार होऊनी.....


वाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे
मनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे. १

नजर ठेवूनी ध्येयावरती
सोबतीला घेवून सखे सोबती
जीवनाचे हे सुंदर गीत गातचं रहावे
वाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे
मनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे २


भले येऊदे लाख अडचणी
ढाल मनाची खंबीर करूनी
संकटरुपी काळ्या ढगांना तू लाथाडावे
वाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे
मनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे ३


गरुडझेप ही तुझी ठरेल मोठी
दुनिया असेल सारी तुझ्याच पाठी
आकाशाला कवेत घेवूनी तू गुणगुणावे
वाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे
मनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे. ४


श्वासं तुझा हाच विश्वासं तुझा
ठाम असुदे नेहमी ध्यास तुझा
याच ध्यासासाठी तू नेहमी जगावे
वाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे
मनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे. ५


आकाश भरारी ही जगा वेगळी
नशीब तुझ्या मनासारखे कोरेल भाळी
कर्तुत्वाच्या या गाथेने यश तुझेचं व्हावे
वाऱ्यावरती स्वार होऊनी नभी उडावे
मनातल्या स्वप्नांनाही नवे पंख द्यावे. ६


डॉ अमित.10 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad