Bluepadमन हे पाखरू💥🕊️
Bluepad

मन हे पाखरू💥🕊️

ऋतुजा चव्हाण..
1st Sep, 2020

Share

खरंच ना ... कधी कधी अस वाटतेय की मन हे पाखुरच आहे.सतत भिरभिरत राहणं. थकत कस नसेल हा एक यक्ष प्रश्न . प्रत्येकवेळी नवीन नवीन रंगा प्रमाणे मनात विचार पिंगा घालतात . कधी चांगले, कधी वाईट पण आपल्याला वाटते अस का..? या मनाला सांभाळताना मात्र अस वाटतेय खरंच एवढे भयानक ही असू शकत काही😅 पण सैनिकाप्रमाने ते काम करते .चांगल्या विचारानं वाईट विचारावर विजय मिळवते.कधी तरी येणारे वाईट विचारही 'डाग अच्छे है ' जाहिराती प्रमाणे चांगले वाटता. मनाला सांभाळताना भल्याभल्याची पळता भुई थोडी होते. आहे की नाही कमाल कारण बऱ्याच जणांना अस वाटत असेल की माझ्याच मनात खूप विचार येता, माझ्याच बाबतीत अस का.. पण अस काही नसते . समुद्राच्या अथांग लाटांना आपण कधी थोपवू शकतो का तसेच आपल्याला मनालाही आपण नाही थोपवू शकतो. पण आपल्या मनाला आपण हाताळू शकतो जस की सतत काहीतरी करणे, गाणे ऐकणे , चित्रपट पाहणे ,आपल्या आवडीच्या गोष्टी करणे ,नवीन शिकणे ,वाचणे ,आपले शरीर पण कार्यरत ठेवणे,यामुळे शरीर आणि मन हे आरोग्यदायी राहील🤗

7 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad