Bluepad | Bluepad
Bluepad
कडूनिंब : घरचा वैद्य
ऋतुजा चव्हाण..
1st Sep, 2020

Share
लहानपणी गावी जाण्यात एक वेगळी मजा होती. कारण दिवाळी आणि उन्हाळी सुट्टी हे मुलांसाठी पर्वणीच असते. या काळात सर्व नात्यातील मुले मौजमजा करण्यासाठी मामाच्या गावी येत असत. तो काळ आठवला की, आजही धावतपळत मामाच्या गावी जावे असं वाटतं. दिवाळीच्या काळातील ती थंडी आणि पहाटेची लगबग याचा कसा तरी ताळमेळ साधला जायचा. पहाटे उठून आंघोळ करायची आणि शेकोटीपुढे जाऊन बसायचं. मग परत फराळाच खायचं आणि जायचं भटकंतीला शेतांमध्ये. आज ही आठवण जागी झाली; कारण यामागे एक कारण होतं, लहानपणीपासून मी पहायचे आमचा भाग तसा दुष्काळी. त्यामुळे बोरी-बाभळीचे झाडे सोडता इतर जास्त कोणती झाडे नव्हती; आणि बोरी-बाभळीच्या झाडांबरोबर एक वृक्ष माझं लक्ष वेधून घ्यायचा तो म्हणजे 'कडूनिंब'. त्याला गावाकडच्या भाषेत कडूलिंब म्हणायचे.

त्याकाळी माझी जरा निराशाच व्हायची; कारण शेती असूनही आपल्याला आवडणारी पेरु, जांभळ, आब्यांची तसेच केळी, फणस ही झाडे काही शेतात पिकत नव्हती. तेव्हा येऊन-जाऊन दिसायचं ते केवळ कडूलिंबाच झाड. मी तशी लहानपणी जरा कल्पनेतच जगणारी होती; कारण लहानपणी पुस्तकातील कोकणातील निसर्गरम्यतेच वर्णन ऐकल की ते आपल्याकडे का नाही? असा मोठा प्रश्न माझ्या मनाला पडायचा? आणि आज हे सर्व आठवल की हसू येत. या झाडाला मात्र मी जशी लहानाची मोठी होत होते तशी अधिक ओळखत जात होते. आज मात्र असंख्य वृक्ष डोळ्यासमोरुन तरळत होते. परंतु लिहितांनी मात्र याच वृक्षाने मला साद घातली.
त्याकाळी माझी जरा निराशाच व्हायची; कारण शेती असूनही आपल्याला आवडणारी पेरु, जांभळ, आब्यांची तसेच केळी, फणस ही झाडे काही शेतात पिकत नव्हती. तेव्हा येऊन-जाऊन दिसायचं ते केवळ कडूलिंबाच झाड. मी तशी लहानपणी जरा कल्पनेतच जगणारी होती; कारण लहानपणी पुस्तकातील कोकणातील निसर्गरम्यतेच वर्णन ऐकल की ते आपल्याकडे का नाही? असा मोठा प्रश्न माझ्या मनाला पडायचा? आणि आज हे सर्व आठवल की हसू येत. या झाडाला मात्र मी जशी लहानाची मोठी होत होते तशी अधिक ओळखत जात होते. आज मात्र असंख्य वृक्ष डोळ्यासमोरुन तरळत होते. परंतु लिहितांनी मात्र याच वृक्षाने मला साद घातली.त्याकाळी माझी जरा निराशाच व्हायची; कारण शेती असूनही आपल्याला आवडणारी पेरु, जांभळ, आब्यांची तसेच केळी, फणस ही झाडे काही शेतात पिकत नव्हती. तेव्हा येऊन-जाऊन दिसायचं ते केवळ कडूलिंबाच झाड. मी तशी लहानपणी जरा कल्पनेतच जगणारी होती; कारण लहानपणी पुस्तकातील कोकणातील निसर्गरम्यतेच वर्णन ऐकल की ते आपल्याकडे का नाही? असा मोठा प्रश्न माझ्या मनाला पडायचा? आणि आज हे सर्व आठवल की हसू येत. या झाडाला मात्र मी जशी लहानाची मोठी होत होते तशी अधिक ओळखत जात होते. आज मात्र असंख्य वृक्ष डोळ्यासमोरुन तरळत होते. परंतु लिहितांनी मात्र याच वृक्षाने मला साद घातली.
गावाला गेल्यावर मनात या झाडाविषयी अपार करुणा वाटायची, प्रेम वाटायचे. प्रत्येक वेळेस गावी गेल्यावर याच झाडाभोवती आम्ही खेळायचो, बागडायचो त्यावेळेस झाडाविषयी विशेष काही माहिती नव्हती. पण या झाडाविषयी मनात एक अंतरिक ओढ होती. म्हणूनच ही झाडे नेहमी डोळ्यासमोर उभी राहायची. ही अबोल झाडे सजीवांना न बोलताच खूप काही दान करतात, खूप काही शिकवतात, तेव्हा विं.दा. करंदीकरांची कविता आठवते,
“देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेणार्‍याने घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे.”
अतिशय सुंदर आशय असलेली ही कविता वृक्षाचा जणू उदारपणाच प्रकट करते. आपणही देणार्‍याची दान करण्याची वृत्ती स्विकारायला पाहिजे अशा अर्थाची ही कविता आहे. आजच्या काळात एकमेकांवर अवलंबून असणारी ही सजीव सृष्टी टिकवायची असेत तर आपल्याला झाडाचे महत्त्व माहित असले पाहिजे आणि याची जाणीव मला मी जशजशी शिकत होते तशी होत होती. लहानपणी मी असंख्य गोष्टी वाचायचे यामुळे माझ्या ज्ञानात भर पडायची.
आजच्या काळात जीवनशैली बदलली. त्याचबरोबर लोकांची मानसिकताही बदलली. माणूस हा आत्मकेंद्गी बनला. सभोवतालच्या वातावरणाची जाणीव त्याला राहिली नाही, याचा परिणाम म्हणजे नैसर्गिक आपत्ती. आज अनेक नैसर्गिक संकटाला माणूस तोंड देत आहे. आज हे सर्व आठवल की, पुन्हा आपल्या लहानपणाकडे वळावं असं वाटत.
कडूनिंब ही सतत हिरवीगार, ताजीतवानी दिसतात. कमी पाण्यातही ते आपलं अस्तित्त्व टिकवतात. कडूलिंब या वृक्षाचा उपयोग उन्हाळ्यात सावलीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. या वृक्षाची पाने कडू असल्याने त्याला कडूलिंब म्हटले जाते. चैत्र महिन्यात या झाडाला आंब्याच्या झाडासारखा मोहोर येतो. कडूलिंबाची फुले लहान पांढरी व सुंगधीत असतात. ही फुले खूपच सुंदर दिसतात. मला ही फुले खूप आवडायची. फुलाचे रुपांतर नंतर फळात होते. ही फळे आधी हिरवी असतात व पिकल्यानंतर ती पिवळी होतात. त्यातील बियांणा 'निंबोळी' असे म्हटले जाते.
कडूलिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे नैसर्गिकरित्या उगवणारे एक बहुपयोगी झाड आहे. या झाडाची फळे, फुले, पाने, साल हे सारेच कडू असते. म्हणून या झाडाला कोणी इतके महत्त्व देत नाही. परंतु याची उपलब्धता लक्षात घेता याचा उपयोगही पुष्कळ आहेत.
कडूलिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे नैसर्गिकरित्या उगवणारे एक बहुपयोगी झाड आहे. या झाडाची फळे, फुले, पाने, साल हे सारेच कडू असते. म्हणून या झाडाला कोणी इतके महत्त्व देत नाही. परंतु याची उपलब्धता लक्षात घेता याचा उपयोगही पुष्कळ आहेत.या उगवणारे एक बहुपयोगी झाड आहे. या झाडाची फळे, फुले, पाने, साल हे सारेच कडू असते. म्हणून या झाडाला कोणी इतके महत्त्व देत नाही. परंतु याची उपलब्धता लक्षात घेता याचा उपयोगही पुष्कळ आहेत.
कडूलिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे नैसर्गिकरित्या उगवणारे एक बहुपयोगी झाड आहे. या झाडाची फळे, फुले, पाने, साल हे सारेच कडू असते. म्हणून या झाडाला कोणी इतके महत्त्व देत नाही. परंतु याची उपलब्धता लक्षात घेता याचा उपयोगही पुष्कळ आहेत.्ण भारतात आढळणारे नैसर्गिकरित्या उगवणारे एक बहुपयोगी झाड आहे. या झाडाची फळे, फुले, पाने, साल हे सारेच कडू असते. म्हणून या झाडाला कोणी इतके महत्त्व देत नाही. परंतु याची उपलब्धता लक्षात घेता याचा उपयोगही पुष्कळ आहेत.
मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा या दिवशी होते. त्यादिवशी गुढी उभी करताना कडूनिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडांच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ घालून केलेली चटणी खावी अशी प्रथा आहे. हिंदूचे नवीन शालीवाहन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरु होते. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून नानाप्रकारचे आजार होतात. अशा आजाराचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकार शक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून पूर्वीपार चालत आलेली ही प्रथा पाळली जाते.
कडूलिंब हा जणू कल्पवृक्षच आहे. याचे असंख्य उपयोग आहेत ते पुढीलप्रमाणे-
 • पाने वाटून त्याचा रस उन्हाळ्यात प्राशन केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. काही लोक हा पेलाभर रस रोज पितात त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
 • कडूलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत, दातांना बळकटी येते.
 • कडूलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही.
 • कडूलिंबाची झाडे तिथे जास्त प्रमाणात आढळतात तेथील हवा शुद्ध राहते.
 • या झाडाच्या फळातील रस काढून त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी होतो.
 • मधूमेह रोग जो आजच्या काळातील जीवनशैलीमुळे पिशाच्च होऊन माणसाच्या मानगुटीवर बसला आहे. त्यासाठी देखील कडूलिंब उपयुक्त आहे. रोज अर्धा कप लिंबाचा रस पिल्याने मधूमेह नियंत्रित करता येतो.
 • कडूलिंबाच्या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल लावल्याने केसाची वाढ जोमाने होते.
 • पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडा गुळ घालून तीन दिवस पिल्यास जंत बाहेर पडतात.
 • अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या पाण्यात १०-१२ कडूलिंबाची पाने ठेचून घालावीत.
 • ताप आल्यास सकाळ-संध्याकाळ कडूनिंबाच्या सालीचा काढा घ्यावा.
 • कडूलिंबाची पाने जखमेवर कुटुन लावल्यास जखम बरी होते.
निंबोळीचे तेलही औषधी आहे. रक्तदूषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात तेव्हा ते तेल लावतात. औषधी गुणधर्मामुळे या झाडाचे साल, मूळ, पान, बिया सर्वच औषधी आहेत.
सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कडूलिंब हे अत्युत्तम जंतूनाशक आहे. ह्याच्या पानांची पुड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयोगी पडतेच, त्यापेक्षा रोपांना किडीपासून दूर ठेवते.
कडूलिंब हा सावलीसाठी देखील महत्त्वाचा मानला जातो. उन्हाळ्याच्या काळात आपल्या शितल छायेने तो मनुष्य, प्राणी, पक्षी या सर्वांनाच आसरा देतो.
आज विज्ञान तंत्रज्ञानाने प्रगती केली. असंख्य समस्यांवर उपाय शोधले आहेत पण त्याचे जेवढे फायदे होतात तेवढे तोटे याच तत्त्वावर ते उदयास येतात. यामुळे माणसाने निसर्गावर कितीही मात करण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही हे विधीवत सत्य माणसाने स्विकारायला पाहिजे. निसर्गानेच आपल्याला निर्माण केले आहे. त्यामुळे त्याला नाकारुन आपण कोणतेही पाऊल उचलले तरी त्यात आपलाच नाश होणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
या सर्व गोष्टी मी जवळून वाचत होते, पाहात होते आणि त्याचा विचारदेखील करत होते. म्हणून तर वृक्षांनी संपूर्ण सृष्टीलाच नवचैतन्य बहार केले आहे. आज पृथ्वीवर सजीवांच अस्तित्व आहे ते केवळ या वृक्षामुळे, म्हणून तर न बोलताच ते आपल्याला खूप काही सांगून जातात. आपल्याला खूप काही शिकवतात. निसर्गात सर्वकाही बदलतयं, पण आपल्याला संयम शिकवतात ते केवळ वृक्षच ! अनेक काळापासून ते सृष्टीला पाहातायत, सांगतायत की जगण्यात स्थिरता ठेवा तरच तुमचं अस्तित्त्व टिकू शकेल. वृक्षाची ही बाबच माझ्या मनाला स्पर्श करुन जाते. म्हणून तर वृक्षाविषयी नेहमी आपूलकी वाटते.
वृक्षांसारख्याच विशाल मनाची माणसे आज निसर्गातील सर्व बदल लक्षात घेवून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करतात. आज वृक्षलागवडीबरोबर त्यांचे संवर्धन करणेही महत्त्वाचे आहे. आज जेव्हा आपण वेगवेगळया पर्यटन क्षेत्रांना भेट देतो तेव्हा तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती लक्षात घेता मला नेहमी माझ्या मराठवाडा भागाची आठवण आल्यावाचून राहात नाही; आणि तेव्हा माझ्या डोळ्यासमोर उभे राहते कडूनिंबाचे झाड. म्हणून आज या झाडाविषयी लिहावेसे वाटले.
हे झाड कमी पाण्यातही तग धरते आणि एका विशाल वृक्षात रुपांतर होते. वार्‍याबरोबर जेव्हा हे झाड डोलते तेव्हा असं वाटतं की हे झाड आपल्यासोबत गुढपणे बोलत आहे, हसत आहे, खेळत आहे. आपल्या सोबत गप्पा मारत आहे. निसर्गाची अद्‌भूत शक्ती ही झाडांमध्ये सामावलेली आहे. वार्‍याबरोबर ही झाडे जेव्हा डोलतात तेव्हा निसर्गाची अद्‌भूत शक्ती लक्षात येते.
निसर्गात एक ऊर्जा प्रवाहित ठेवण्याच काम ही वृक्ष करतात. आज झाडे आहेत म्हणून सर्व सजीव आहेत. झाडांचे महत्त्व आज प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. कर्तव्यवान झाडांकडून आपण दातृत्त्वाचा गुण घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनातील आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे. आज जेव्हा उपचार पद्धतीत सर्व उपचारांनी जेव्हा फरक पडत नाहीत तेव्हा शेवटी झाडांच्या औषधी गुणधर्माचाच उपयोग केला जातो. आज निसर्गाकडून आपल्याला हे विनामूल्य मिळत आहे. पण याची किंमत आपण केली पाहिजे.
आजही माझ्या घराच्या अंगणात कडूलिंब डौलाने उभा आहे. आजही जेव्हा आम्ही गावी जातो तो माझ्याशी बोलतो आणि जेव्हा तो वार्‍याबरोबर डोलतो तेव्हा तो अधिक सुंदर भासतो. निसर्गाने या वृक्षामध्ये खूप काही भरलेले आहे. कधीही हिरवागार असणारा वृक्ष उन्हाळ्यातही सावलीत ते आश्रय घेणार्‍याला 'कृतज्ञ' करतो.
लहानपणी आम्ही जेव्हा या वृक्षाखाली खेळायचो, झाडावर चढायचो तेव्हा खूप मजा यायची. आजही या आठवणी ताज्या झाल्या की, माझे मन या वृक्षाला शोधते. असंख्य उपयोग असणार्‍या या वृक्षाचे स्थान मात्र पूर्वीसारखे राहिले नाही. शहरी भागात तर आज हा वृक्ष दिसत नाही. म्हणूनच की काय असंख्य वृक्ष मी माझ्या आसपास पहात होते पण माझ्या मनात ज्याने घर केले होते, त्याला पहात मी लहानाची मोठी होत होते. आज त्यांची संख्या कमी होवून मात्र मनात काहूर माजत होता.
शहरी भागात तर आज झाडांची संख्या प्रचंड कमी होत आहे. याचा परिणाम म्हणून प्रदूषण वाढत आहे. अनेक समस्या निर्माण होत आहे. श्वसनाचे विकार होत आहेत. आज हे सर्व कमी करायच असेल तर झाडे लावावीच लागणार आहेत. केवळ झाडे लावायचीच नाही तर त्याचे संगोपनही करावेच लागणार आहे. आज हे सर्व पाहताना मला मात्र माझ्या लहानपणीच्या वृक्षाचीच आठवण येते. आज त्यांचे अस्तित्त्व खूप सार्‍या समस्या नष्ट करतील.
या झाडाला ना जास्त पाण्याची गरज लागते ना जास्त काळजी घ्यावी लागते. या झाडाची वाढ जोमात होते. झाडाची वाढ झाल्यानंतर तर मात्र काहीच काळजी घेण्याची गरज नाही. नंतर तेच आपली काळजी घेते. प्रदूषणापासून आपले संरक्षण करते म्हणून या झाडाचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे.
दैनंदिन जीवनातही आपल्याला असंख्य उपयोग आहे. दुसर्‍या झाडांच्या तुलनेत या झाडाचे काहीच नखरे नाहीत म्हणून तर मला हे झाड आवडते. आयुर्वेदातही या झाडाला प्रचंड महत्त्व आहे. अशाप्रकारे या झाडाचे महत्त्व लक्षात घेवून आपल्याला याला दुर्लक्षित करुन कसं चालेल. माझ्या गावाची हीच संपत्ती आहे आणि मला ही जपायची आहे. यासाठीच हा छोटासा प्रयत्न.
निसर्गातील हा खजीना आपल्यासाठी अनमोल आहे. या खजीन्याशिवाय आपले जीवन मौल्यवान होऊच शकत नाही. आपल्याला आपले जीवन खर्‍या अर्थाने समृद्ध करायचे असेल तर आपल्याला या झाडाला जपावे लागणार आहे. त्याच्या अस्तित्त्वासाठी झगडावे लागणार आहे. केवळ झाडे लावायचीच नाही तर त्याचे संगोपन पण करावे लागणार हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे. आज शहरीकरणांमुळे प्रत्येक माणूस कृत्रिम होत चालला आहे. त्याने वेळ काढून आपल्या भागातील नैसर्गिक भागाचा आढावा घेतला पाहिजे; कारण केवळ पैसा हेच आपले जग नाही. आपल्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि मुख्य म्हणजे प्राणवायू याची आवश्यकता आहे. हे आपल्याला निसर्गाखेरीज कोणीही विनामोबदला देणार नाही हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे.

30 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad