Bluepadये पैसा बोलता है.......ये पैसा बोलता है.
Bluepad

ये पैसा बोलता है.......ये पैसा बोलता है.

डॉ अमित.
डॉ अमित.
31st Aug, 2020

Share

ये पैसा बोलता है.......ये पैसा बोलता है.
भावनांवर आवर होता नि
शब्दही खोलवरं दबून होते
अश्रू डोळ्यात दाटलेले मात्र
मनातल्या मनात झिरपतं होते

इतके दिवस मनाच्या खोल गाभाऱ्यात दडलेले शब्द आज मोकळे होवू पाहत होते.भावना अनावर होण्यास उतावीळ झाल्या होत्या.अश्रूंनी बांध तोडला होता आणि मनातली जखम आज चिघळली होती.निमित्त होते नात्यांनी न जपलेली नात्यांची वीण.अस्त्राची जखम भरते पण नाही भरत शब्दांची जखम लवकर.
कधी कधी काय होते आपण एखाद्या नात्यासाठी आपले सर्वस्व देतो,ते नाते जपण्यासाठी आपले तन मन धन पणाला लावण्यास आपण तयार असतो, नव्हे ते आपण पणाला लावलेले असते.ते नाते आपण फुला प्रमाणे जपत असतो आणि मनापासून ते नातं जगत असतो....पण कधी नियती ला हे मान्य नसते आणि अचानक नियतीचं मग आपल्याला नात्याचा खरा रंग उलगडून दाखवते.
मग होतो रंगाचा बेरंग.सप्त सुर नकळत बेसूर जाणवू लागतात नि नात्याचा ओलावा ही शुष्क असा भासू लागतो.
असं समजलं जातं की नात्या मध्ये नेहमी लहानांचं चुकतं नि मोठे नेहमीचं बरोबर असतात...पण कधी कधी परस्थिती नेमकी उलटी असते....मोठे फक्त वयाने वाढेलेलेच राहतात पण विचार मात्र संकुचित ठेवतात.

आपल्यात असं म्हणतात की
साठी बुद्धी नाठी,त्यापुढे जावून मी म्हणतो की कधीकधी वयाचा सत्तर चा आकडा...बुद्धीची लक्तरं काढतो तर ऐंशी....बुद्धीची ऐशी च्या तैशी करून टाकते. सारासार विचार शक्ती गोठवून टाकते.
इतक्या वर्षे जपलेले, जाणलेले,फुलवलेले नाते अचानक कोमेजून जाते.....नात्याचा मंद गंध लोप पावतो...मोठ्यात दडलेला संकुचितपणा.... नि लहानांनी दाखवलेला थोर पणा हळुवार समोर येतो.
सर्वांत वाईट तेंव्हा वाटते जेंव्हा या सर्वात मध्ये येतो तो पैसा.....तो वाटचं पाहत असतो नात्यात दरी निर्माण करण्याची,नात्याला प्रेमा पुढे पैश्याने झुकवण्याची.... कर्तव्याचा विसर पाडण्याची किंवा केलेल्या सेवे चा सविस्तर विसर पाडण्याची.हीच तर या पैश्याची किमया...


कधी तो असतो कधी तो नसतो
कधी कधी तो असूनही रुसतो
हा पैसा मोठा किमयागार
कधी तो नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो


वाचलं तर गूढ वाटेल, कदाचित अर्थही लागणार नाही तुम्हाला या लेखाचा...
संदर्भ नाही लागणार पण दर्भ येत राहील...
वेदना नाही कळणार पण संवेदना जाणवत राहील..
लक्ष नाही लागणार पण लक्षात अवश्य राहील...
भाव नाही कळणार पण भावना मनात रुजतील..
अर्थाचा अनर्थ नाही होणार पण लेख सार्थ अवश्य होईल.....

अर्थ नाही पण तथ्य आहे
अर्थात खूप सामर्थ्य आहे
गहिवरलेले मनातले शब्द आज
गुणगुणले ये पैसा बोलता है.डॉ अमित.

13 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad