Bluepad | Bluepad
Bluepad
जरा मानसशास्त्र कडे...
ऋतुजा चव्हाण..
30th Aug, 2020

Share

लिहिताना,वाचताना,जगताना,बोलताना मला जीवन हा शब्द खरंच खूप अनमोल वाटतो. गंमत म्हणजे जीवनाचे वेगवेगळे टप्पे टप्पे माणूस त्याच्या आयुष्यात जगातअसतो. लहानपणीचा एक काळ असतो जिथे तो प्रचंड गुणी असतो. सभोवताल च जग हेच आपल जीवन वाटायला लागत.त्याला कारणही तशीच असता , तेच लहानपणीचे विचार जे आईवडील नेहमी त्याच्या कानावर घालत असता अन् त्याचप्रमाणे त्याचीदेखील जीवन पद्धती बणत जाते.
लहानपणी अनेक वेळा आईवडील रागवता ,वाईट बोलता अश्यावेळी मात्र त्याचे मन दुखवते आणि विचार करायला लागते खरंच आपण इतके वाईट आहोत का ?बराचवेळ काही चुकले तर आई मनते तू नालायक आहे आश्या वेळी मुल विचार करायला लागत खरंच आपण किती मंद आहोत बरीच कामे आपल्याला जमत नाहीत.आई मणते तसा आपला लहान भाऊ किती हुशार! आपणच असे कसे ? अस एकदा नाही अनेकदा घडत जातं याने मुल केवळ कमजोर च नाहीतर निराश होत जाता.
प्रत्येकवेळी आईवडिलांचा हेतू वाईटच असतो अस तर नसते पण प्रत्येक मुल हे खम कंच असते अस पण नाही ना..याचा विचार जरूर व्हायला हवा. मुलांना ओळखून त्याप्रमाणे वागणूक द्यायला हवी. याक्षणी मुलांपेक्षा पालकांनी याचा जास्त विचार करायला हवा कारण लहान मूल हे चिखला सारखी असता त्यांना जसा आकार देऊ तशी ती घडता.
काळाबरोबर मुल मोठी होता .आसपासच्या घटनेचा चांगला वाईट अर्थ लावायला शिकत असता. अशावेळी त्यांना त्यांचे निर्णय घेऊन द्याला हवे. त्यांना मार्गदर्शन जरूर करा पण निर्णय मात्र त्यांनाच घेऊन द्या. हे त्यांच्या आयुष्याचा मंत्र आहे आणि तो त्यांनाच वापरू द्या.
यानंतर मुल तारुण्यात येतं तेव्हा मात्र ते प्रगल्भ झालेले असता. असंख्य गोष्टी ते अभ्यासत असता . चांगले वाईट अंदाज बांधत असता. अश्यावेळी त्यांचे मित्र बना. ज्या मुलांना आईवडील सारखे मित्र असताना ती आयुष्यात चांगलं नाही जमल तर वाईट पण काम कधी करत नाहीत. आपल्याला आपल्या वयाचेही मित्र हवेत. ही सर्व मंडळी आपल जीवन सुकर करता

17 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad