Bluepadपरिस स्पर्श ......आयुष्याचे सोनं करणारा स्पर्श.
Bluepad

परिस स्पर्श ......आयुष्याचे सोनं करणारा स्पर्श.

डॉ अमित.
डॉ अमित.
30th Aug, 2020

Share

परिस स्पर्श ......आयुष्याचे सोनं करणारा स्पर्श.खूप वर्षांपूर्वी म्हणजे लहानपणी आपल्यातील प्रत्येकाने एक गोष्ट नक्कीच ऐकलेली असेल ती म्हणजे
परिसाची गोष्ट.
त्या गोष्टीत एक माणूस असा दगड शोधत असतो की ज्याचा स्पर्श लोखंडाला झाला की त्याचे सोने होते.
दगड शोधून आपल्या चेनला लावण्याच्या नादात त्याचे आपल्या गळ्यातील चेन कडे लक्षच नसते.ती कधी सोन्याची झाली आणि कोणता तो दगड होता,परिस होता ज्यामुळे ती साखळी सोन्याची झाली हे त्याच्या लक्षातच येत नाही.

माणसाचे आयुष्य ही असेच आहे.
आपण ठराविक उद्दिष्ट ठेवून ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात कधी कधी आपल्या हातात आलेल्या सोनेरी क्षणांना, जवळच्या सोन्या सारख्या माणसांना आलेल्या सुवर्णसंधीला मुकतो,दुर्लक्षित करतो.जीवनाच्या एका वळणावर मग तो कधी एकटा पडला हे त्याच्या लक्षातच येत नाही.हे एकटेपण,ही असहायता टाळण्यासाठी आपण माणसातलाच परिस शोधण्याचा प्रयत्न करावा.
कारण मला तर वाटते प्रत्येक माणसात एक परिस दडलेला असतो.आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही चांगले गुण घेवून जन्माला आलेली असते.आपण फक्त त्याचा शोध घेवून ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा.


गुणांचा गुणाकार करा नी
दुर्गुणांचा करूनी भागाकार
होते माणसाचे ही मग परिस
नी होतो आयुष्याचा सुवर्णहार.


बऱ्याच वेळेस आपण एखाद्याच्या गुणांपेक्षा त्याच्या दुर्गुणांचीच चर्चा जास्त करतो.अथवा त्या व्यक्तीला गुणांपेक्षा दुर्गुणांनीच जास्त ओळखतो.मग सुरू होतो मत्सराचा जीवघेणा खेळ.
पण या विरुद्ध जर आपण त्या व्यक्तीचा एक छोटासा जरी चांगला गुण असेल तर तो ओळखावा,त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करावा.तो आपण स्वतः मध्ये भिनवावा.

मग पहा कशी माणसे माणसाशी जोडली जातात.
आज हे एकमेकांच्यातील भावनिक नाते संपुष्टात येत आहे.आजकाल माणसं जवळ न येता फक्त हेतू वा व्यवहार जवळ येतो आहे.हेच तर आपल्याला टाळायचे आहे,संपवायचे आहे.माणसं माणसांशी जोडायची आहेत.एकमेकांची मने जपायची आहेत.स्पंदने जुळावित हृदयांंची
व्हावी माणसांची साखळी
हा स्पर्श होईल मग परिसाचा
जीवनाची उमलेल सोनेरी पाकळी.शेवटी मी परिस हा शब्द उलगडून सांगू इच्छितो,

परिसाचा प प्रेमाचे प्रतीक व्हावे
परिसाचा र रामाचे प्रतीक व्हावे
परिसाचा स सुंदरतेचे प्रतीक व्हावे

मग हा प रि स जीवनात ईश उतरवतो आणि आपले जगणे सोनेरी करून टाकतो की नाही ते पहा.


डॉ अमित.


13 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad