Bluepadक्षणिक...😉
Bluepad

क्षणिक...😉

ऋतुजा चव्हाण..
26th Aug, 2020

Share


देव आहे की नाही माहीत नाही याविषयी आपण अनेक वेळा विचार करतो .. उत्तर मिळते ही पण तेही कोणाच्या ना कोणाच्या रुपात. अगदी टीव्ही मध्ये दाखवता तसा तर देव कधी मिळणार नाही याची तर आता या वयात खात्री पडली. खर किंवा खोटं सोडा ना पण त्या मागील मानवाची कल्पनाशक्ती तसेच प्रेरणा याचा विचार केला तर थक्क व्हायला होते. किती सुदंर सादरीकरण! क्षणभर मन विचार करते भलेही खरे नसेल पण त्यामागील चांगली प्रेरणा तसेच वास्तविकता ही तर आपण समजू शकतो . सण व उत्सव किती सुदंर रीतीने रचले आहेत. आपल्याला वाटते की यात आपला वेळ पैसा जातो पण अशा वाटणाऱ्या माणसाच्या आयुष्यात ही एक वेळ येतेच ना की त्यावेळी त्याला जगण्याचा खरा अर्थ शोधण्याची गरज भासते.तेव्हा त्याच्याकडे पैसा , संपती सर्व काही असते पण जो आनंद असतो तो मात्र त्याला सापडूच शकत नाही. किती कटू असेल तरी सत्य आहे मानवाला भावना सारखं शस्त्र मिळालं आहे. त्याची धार प्रत्येक मानवा गनिक कमी जास्त आहे पण ती आहेच.त्यामुळे त्याला आपण आपल्या बुद्धीच्या म्यानेत सुरक्षित ठेवलं पाहिजे नाही तर आपणच जखमी होऊ शकतो.
आपण जसे आहोत तसे जगता यायला पाहिजे पण जगालाच पाहिजे. आयुष्यातील पर्याय जीवन सोपे करतील पण ते आपल्याला जगवतीलच अस नाही..

8 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad