Bluepad | Bluepad
Bluepad
सायकल, रि-सायकल ...कल आज और कल.
डॉ अमित.
डॉ अमित.
26th Aug, 2020

Share

सायकल__रि-सायकल......कल आज और कल.सायकल हा शब्द नुसता उच्चारला तरी काही ना काही आठवणी माझ्या, नव्हे नव्हे प्रत्येकाच्याच मनात जाग्या होतात.
मन एकदम भूतकाळात रमायला होतं.
ती येते आपल्या आयुष्यात सुरुवातीला छोट्या रुपात,तीन चाकांवर बसून.. आपल्या बालपणीचे तिचेही हे बाल रूप,छोटे रूप आपल्याला तिच्या तीन चाकांवर घरभर मिरवत राहतात.
तिच्या ट्रिंग ट्रिंग या घंटीचा नाद आपल्याला त्यावेळी इतका नादी लावतो की आपण तिच्या सोबत खेळताना जणू तहान भूक सारेच विसरून जातो.बघता बघता वेळ पुढे पुढे जातो नी मग तीन चाकाची सायकल मागे पडून वेध लागतात ते दोन चाकाच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या सायकल चे.
मला अजूनही आठवतंय की मला सायकल
घेण्यासाठी मी माझ्या पप्पांकडून दर ठराविक दिवसांनी थोडे थोडे करत पैसे घेवून ते माझ्या पिगी बँकेत साठवले होते.त्यावेळी फक्त पाचशे रुपयाची मला आणलेली हिरो ची सायकल मिळाल्यावर मला स्वतःलाही हिरोच झाल्यासारखे वाटतं होते.
वेळ वेगाने पुढे गेला नि सायकल हातातून सुटून कधी गाडी ने तिचा ताबा घेतला कळलेच नाही.पण राहून राहून सायकल मला नेहमीच खुणावत होती जणू ती मला तिची आठवण तर करून द्यायचा प्रयत्न तर नव्हती ना करत?तिची ट्रिंग ट्रिंग माझ्या कानात जणू गुणगुणत होती.
माझ्या मनाच्या कोपऱ्यात मात्र ती तिथेच दबा धरून होती, जणू ठाण मांडून बसली होती.

आज वयाची चाळिशी आली बरेचं बदल झाले आयुष्यात पण सायकल वरच माझं प्रेम अजूनही तसचं होतं.मग मी ठरवलं की किमान जवळच्या अंतरासाठी तरी सायकल वापरायची.
गेल्या नऊ महिन्यांपासून मग मी रोज न चुकता सकाळी सात वाजता सायकल वरच योगा क्लासला जाऊ लागलो.
मला वाटतं जिम मध्ये जाऊन आपले ठिकाणही न सोडणारी ती सायकल चालवण्या पेक्षाही खरी सायकल घेवून मोकळ्या हवेत निसर्गाच्या सान्निध्यात एक रपेट मारणे केंव्हाही बेहत्तर.

मध्यंतरी नेदरलँड या देशाबद्दल एक बातमी वाचण्यात आली.या देशातील लोक सर्वात जास्त निरोगी असल्याचा निर्वाळा आरोग्य संघटनेने दिला होता.त्याची कारणं मिमांसाही दिली होती.
१.६ कोटी लोकसंख्येच्या या देशात २.४ कोटी सायकली आहेत.तेथे मुले देखील चालत अथवा सायकल वरच शाळेत जातात.खेळ आणि सायकलिंग याला या देशात खूप महत्व दिले आहे. कार्बन डायॉक्साईड च्या उत्सर्जन चे प्रमाणही या देशात अत्यल्प आहे.असे म्हटले जाते की या देशात मुल चालण्या अगोदरच सायकलच्या दुनियेत त्यांचे स्वागत केले जाते.या देशात सायकलिंग साठीचे वेगळे रस्ते बनविलेले आहेत.
मला वाटतं आपणही आपल्या देशात का नाही हे अमलात आणू शकत?नक्कीच आणू शकतो त्याची सुरुवात मात्र प्रत्येकाने स्वतः पासूनच करायला हवी.
प्रत्येकाने किमान आठवड्यातील एक दिवस आपल्या गाड्यांना विश्रांती देवून चालत अथवा सायकलचा वापर करावा.शक्य असेल तिथे,जवळच्या अंतरावर जाताना सायकलच वापरायची.पेट्रोलियम पदार्थाच्या वाढत्या गरजेला थोडा तरी खीळ अवश्य लागेल यामुळे.
वाहनांचे प्रदूषण कमी होईल.आपले आरोग्यही त्याने चांगले राहील.

आपला कल,आपले भविष्य नि सरते शेवटी आपले आरोग्य ज्यामुळे निरोगी राहील अश्या या सायकल ला आपण आपल्या जीवनात पुन्हा रि-सायकल नक्कीच करायला पाहिजे असं मला वाटतं.जूनं ते सोनं उगाच थोडी म्हणतो आपण. अश्या या सोन्या सारख्या सायकल ला मग आपण आपल्या जीवनात परत स्थान नक्कीच द्यायला नको का?

चला तर मग सगळे आपण आपला भूतकाळ रिवाइंड करू आणि सायकल घेऊन भविष्यात एक निरोगी रपेट करून येऊ......येताय ना मग माझ्या सोबत सायकलची रपेट करायला?धर हॅण्डल मार पॅण्डल
हो सायकल वर तू स्वार
लाजू नको बुजू नको तू
कर ट्रिंग ट्रिंग पुन्हा एक वारट्रिंग ट्रिंग...ट्रिंग ट्रिंग.


डॉ अमित.

11 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad