Bluepadप्रेम.......मावळतीकडे झुकलेले.
Bluepad

प्रेम.......मावळतीकडे झुकलेले.

डॉ अमित.
डॉ अमित.
25th Aug, 2020

Share

प्रेम.......मावळतीकडे झुकलेले.


प्रेम एक सुंदर असा शब्द.एक विलक्षण अशी अनुभूती.मग ते कोणाच्यातीलही असो.आई आणि मुलं, भाऊ-बहीण,नवरा-बायको.दोन जिवलग मित्र.
या सर्वांत एक प्रेम असते ते म्हणजे नवरा आणि बायकोचे.कुठलेही रक्ताचं नातं नसताना खुलतं जाणारं मैत्रीच्या नात्या सारखेच एक अनोखे नाते.हे प्रेम अधिक प्रकर्षाने जाणवते जेंव्हा संसाराच्या अश्या टप्प्यावर ज्यावेळी तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात.मुल मोठी झालेली असतात.त्यांना पंख फुटलेली असतात आणि ते त्यांच्या आकाशात स्वतंत्र भरारी घेत असतात.
तेंव्हा मात्र तुम्ही फक्त एकमेकांसाठी असतात,फक्त एककमेकांचेच असता.फळ जसे खूप दिवस झाडाला राहिले की ते पिकते गोड होते तसे तुमचे संसाराच्या या झाडावरचे हे प्रेम आणखी परिपक्व होते, सुमधुर होते.
वयाची साठी ओलांडली असते,हातात काठी आलेली असते.दुखणी,आजार अधून मधून डोकं वर काढत असतात.या सर्वांत तुम्हाला धीर देत असतो तो म्हणजे तुमच्या जोडीदाराचा हाथ,त्याची प्रेमाची साथ.


हाथ हातात घेवून
साथ एकमेकांची देवून
इथपर्यंतचा प्रवास केला
एकमेकांची मने जपून.


स्वतःच्या भुकेपेक्षा चिंता असते ती जोडीदाराने काही खाल्ले की नाही याची.स्वताच्या दुखण्या पेक्षा वाईट वाटत असतं ते त्याच्या किंवा तिच्या होणाऱ्या त्रासाचं.
डोळे टचकनं भरून येतात एकमेकांसाठी.

हे असे प्रेम वयाच्या नाजूक,मावळतीकडे झुकणाऱ्या या वळणावर मी प्रत्यक्ष अनुभवले त्या वयाला पोहोचण्या पूर्वीच माझ्या डोळ्यांनी.
ते प्रेम म्हणजे माझ्या आजी आजोबा
यांच्यातले.त्यांच्या परस्परांतील नात्याचे.
त्यांच्या संसाराला साठ किंवा क्वचित् त्याहून अधिक वर्षे झालेली असतील.आतापर्यंत सुख दुःखात एकमेकांची साथ कधीच न सोडलेली.....पण नियतीला हे थोडेचं असते मंजूर.ती तर आपले वेगळेच गणित मांडत असते आपल्या समोर सोडवायला.प्रश्न अवघड असतो पण उत्तर तर द्यावेच लागते.अचानक एक जोडीदार नियती हिरावून घेते,जशी माझी आजी गेली आजोबांना सोडून.इतक्या वर्षांची त्यांची सोबत सोडून.त्यांना शरीराने नि मनाने एकटे करून....


वाटले नव्हते कधी
ही वेळ येईल इतक्या लवकर
हाथ सुटला हातातूनी
जेंव्हा साथ हवी होती निरंतर


मला वाटतं हे कधी ना कधी तर होणार होतंच.दोघांपैकी एकजण साथ तर सोडणार होतंच.काही गोष्टी तर अटळ असतातच.
हे प्रेमच असतं जे तुम्हाला हे सर्व सहन करण्याची ताकत देतं,बळ देतं,हिम्मत देतं.

मग का नाही तुम्ही या प्रेमाला तरुणपणातच आणखी कसोशीने जपण्याचा,फुलवण्याचा प्रयत्न करत?
आणि तुम्ही तो करत असाल तर तुमचं मनापासून अभिनंदन.करत नसाल तर माझी तुम्हाला प्रेमाची विनंती की तो तुम्ही अवश्य करावा.

सूर्य झुकतो मावळतीकडे
तसे हे आयुष्य ही झुकते
साथ असता जोडीदाराची प्रेमाची
मावळतीला ही मग पुन्हा पहाट होते.डॉ अमित.
13 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad