Bluepadमन... एक मंदिर-मन:शक्ती कडून मनःशांती कडे.
Bluepad

मन... एक मंदिर-मन:शक्ती कडून मनःशांती कडे.

डॉ अमित.
डॉ अमित.
24th Aug, 2020

Share

मन... एक मंदिर-मन:शक्ती कडून मनःशांती कडे.


मन करावं हलकं फुलकं
दूर सारून विचारांचे काहूर
फुलांनाही सोसवत नाही क्वचित
स्वतःच्या गंधाचाही अदृश्य भारकधी झालंय का तुम्हाला असं....उगीचं मनावर ओझं असल्यासारखं.....मला वाटतं नक्कीचं झालं असणार.
आयुष्याच्या एखाद्या अवघड किंवा अनोळखी वळणावर....कधी खरंच एकटं असताना किंवा कधी गर्दीत एकटं हरवल्या सारखं असताना.
उगाच मनावर कसलं तरी ओझं जाणवतं किंवा मन विचारांच्या गर्दीत गुदमरून गेल्यासारखं होतं.मला वाटतं हे का होत असावं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?
अरेच्चा आता हे काय? मी तुम्हाला विचारांच्या गर्दीतून बाहेर काढायचं सोडून नवीन कसला विचार करायला सांगतो आहे?
माझी पण कमालच झाली.
होत मला पण असं कधी कधी... कारण मला पण मनं आहे अगदी तुमच्याच सारखं बरका.
...उगाच आपली गंमत मनात आलेली.

आपल्या रामदास स्वामींनी नाही का हे सांगितले की,

मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धी चे कारण

मला वाटतं आपल्या सर्व समस्यांचे कारण हे आपले मनचं आहे.
हे कधी रागावतं तर कधी प्रेम करतं.
कधी आनंदी असतं तर कधी दुःखात डुंबून गेलेलं असतं.कधी हलकं फुलकं असतं तर कधी या मनावर मणभरं ओझं असतं.
मग या मनालाचं जर आपण जपलं,सावरलं, गोंजारल,एका परीने शिस्तीत आणलं तर...तर सगळी दुःखे, सगळी ओझी आपोआपच हलकी होतील.या साठीच तर कित्येक वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचून ठेवले आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात तर हे मनाचे श्लोक नक्कीच आपलं मनं .....एक मंदिर करतील.एकदा का हे मंदिर झालं की कुठलाच ताण,कुठलाच तणाव,कुठलचं ओझं,कुठलाच राग या मनावर राहणार नाही.....आजचे सायन्स सुद्धा हेच सांगते आहे की कुठल्याही आजाराचे मूळ मनातचं रुजून ते आपल्या शरीरावर त्याचे अनिष्ट परिणाम करतं, ज्याला मनोकायिक आजार असे संबोधले जाते.

मनाची शक्ती आहे मोठी खूप
सामर्थ्य आहे याचे अपरिमित
तोची गाजवेल विश्वावरं प्रभुत्वं
जाणले ज्याने हे मनाचे गुपितं


तेंव्हा सर्वात महत्वाचं म्हणजे हे आपले मन. यावर आपण स्वार व्हायचं आणि याचा लगाम मात्र आपल्या हातात ठेवायचा...याला नेहमी चांगल्या कामांत गुंतवून ठेवायचं...कुठलीही गोष्ट करायची ती अगदी मन लावून आणि मनापासून.मग ते आपलं रोजचं काम असुदेत किंवा आपलं जेवण असुदेत किंवा आपली कुठलीही कृती असुदे ती करायची एकदम मनापासून.प्रत्येक कामात मनाला सामावून घ्यायचे...
याने काय होईल की आपले काम तर अधिक चांगले होईलचं पण काम चांगले झाल्याने आपण आणखी उत्साही होऊत.
आनंदी आनंद गडे
जिकडे तिकडे चोहीकडे
आनंदी मन आनंदी आपण
देवाकडे आहे फक्त हेचं साकडेडॉ अमित.18 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad