Bluepadहितगुज.....लाडक्या बाप्पाशी.
Bluepad

हितगुज.....लाडक्या बाप्पाशी.

डॉ अमित.
डॉ अमित.
22nd Aug, 2020

Share

हितगुज.....लाडक्या बाप्पाशी.


आज आला आहेस बाप्पा
दमला असशील इतका दूरचा प्रवास करून
थोडासा आराम कर...
भूक पण खूप लागली असेल ना?
आवडीचे मोदक केलेत खावून घे मनसोक्त
मग सांगतो सविस्तर...अगदी सारं मनातलं
या विसाव्या साला विषयी...
जरा म्हणून विसावा नाही या जीवाला
मला वाटतं तू हे वर्ष आमच्यासाठी
जरा गडबडीत लिहिलं आहेस बहुतेक
की आमच्या सर्वांचंच चुकलं इतक्या वर्षे
ज्याची शिक्षा तू यावर्षी दिलीस...असो
तक्रार नाही करत पण मनातलं बोलतोय थोडंसं
तो इतकासा विषाणू... कोविड
पार वीट आणला त्याने..जायचं नावं घेत नाही
तसे त्यानं बऱ्याच गोष्टी शिकवल्यात
काही चांगल्या काही टोचणी देणाऱ्या
पण आता सहनशक्ती संपतेय की काय
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून बांध मोकळा करावा
असं राहून राहून वाटतय या मनाला
तू समजुन घेशीलच...बुद्धीचा देवता ना तू
तू विघ्नहर्ता म्हणुनच हक्काने सांगतोय
म्हणशील आल्या आल्या का हे रडगाणे गातोय
काय करू फक्त दहाच दिवस आहेस तू
वेळ कमी आहे आख्ख जग सावरायचंय तुला
पण आम्ही देखील आहोत तुझ्या सोबत
शिस्तीचे नि नियमाचे काटेकोर पालन करत
योग्य ती खबरदारी घेवून तुला मदत करायला
माणसा माणसातील माणुसकी जपायला
तू देव आहेस....हवा तो वर देवू शकतोस
बस फक्त इतकचं आहे मागणं नाही म्हणू नकोस
संकटात कधीही आमची साथ सोडू नकोस...


डॉ अमित.

9 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad