Bluepadमोकळा श्वास...आयुष्य बनवतो खास.
Bluepad

मोकळा श्वास...आयुष्य बनवतो खास.

डॉ अमित.
डॉ अमित.
22nd Aug, 2020

Shareमोकळा श्वास...आयुष्य बनवतो खास.


आजकाल प्रत्येक जण कशाचा न कशाच्या तरी तणावाखाली सतत वावरत असतो.
काम, पैसा,प्रपंच अशी रोजच्या दैनंदिनीचीच उदाहरणे जी प्रत्येकाला या ना त्या रूपाने तणावाशी ओळख करून देत असतात.त्याचा परिणाम असा होतो की आपण मोकळा श्वास घेणेच विसरतो आहोत किंवा मी तर असे म्हणेण की आज आपण मोकळा श्वास घेणेच विसरत चाललो असल्यानेच आपल्याला ताण तणावाला सामोरे जावे लागत आहे.
मी तुम्हाला मोकळा श्वास नेमका किती आणि कशा प्रकारे घ्यायचा ते सांगतो म्हणजे मोजून नव्हे बर का घ्यायचा...

रोज सकाळी मोकळ्या हवेत सूर्याला वंदन करून किमान चार तरी सूर्यनमस्कार घालावेत.सूर्यनमस्काराने अंग अंग मोकळे तर होईलच पण आपली फुफ्फुसे देखील पूर्णपणे मोकळी होतील आणि जास्तीत जास्त प्राण वायू शरीराला मिळेल. जणू काही सूर्याचे तेज आपल्यात उतरेल आणि आपले आयुष्यही तेजस्वी करेल.
प्राणायाम हा मोकळा श्वास घेण्याचा राजमार्ग आहे.
प्राण म्हणजे श्वास आयाम म्हणजे लांब दीर्घ असा.दीर्घश्वसन हा शरीरा पासून आजारांना दीर्घ अंतरावर ठेवण्याचा हुकमी एक्काच आहे जणू.
मनही मग मोरपिसा सारखे हलके हलके होईल.


       शोधतो तुला मी इथे तिथे
                     तर तू मला न सापडतो
       पाहतो मी माझे अंतरंग जेंव्हा
                    तो तू तर तेथेच राहतो


हा तू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे "आनंद".
बऱ्याच वेळी आपण आनंद शोधतो तो एखाद्या वस्तूत व्यक्तीत अथवा परिस्थितीत.पण तो तेथे नसून तो तर दडला आहे तुमच्या मनात.जेंव्हा आपण मोकळा श्वास घेतो तेंव्हा आपले मनही निर्मळ होते आणि ते छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी राहते.आनंदी मन हे जणू आनंदाच्या लहरी पसरवत जातात.ह्या लहरी मग संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी करून जातात.

   आनंदाचे डोही आनंदी तरंग.

असा हा आनंद डॉक्टरी भाषेत सांगायचे झाले तर साथीच्या आजारासारखाच असतो.बघता बघता तो चोहीकडे पसरतो.
पण ही आनंदाची साथ हवी हवीशी वाटणारी असते बरकां..

 आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.

पण आयुष्य म्हणजे फक्त सुख एके सुख किंवा आनंदच नसते.
कधी कधी आपणा प्रत्येकाला अनपेक्षित दुःखाला सामोरे जावेच लागते.अश्या वेळी तर उपयोगी पडतो तुम्हाला योगाचा,प्राणायामाचा आणि आनंदाचा पूर्वी केलेला सराव.
जो तुम्हाला कठीण अथवा दुःखाच्या प्रसंगी ते सहन करण्याची ऊर्जा देतो,हिम्मत देतो.


 असशील तू हसशील तू
   जेंव्हा जेंव्हा मोकळा श्वास घेशील तू
 खऱ्या अर्थाने जगशील तू
   जेंव्हा जेंव्हा आनंद दुसऱ्यांना देशील तू.


डॉ अमित.11 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad