Bluepadआयुष्य सोपे झाले आहे....
Bluepad

आयुष्य सोपे झाले आहे....

डॉ अमित.
डॉ अमित.
21st Aug, 2020

Share

आयुष्य सोपे झाले आहे....


माझ्यातले मी पण विसरू लागलो
जेंव्हा पासून कामात राम पाहू लागलो
माणुसकी मध्ये विश्वास आणखी दृढ झाला
तेंव्हापासून आयुष्य सोपे झाले आहेछोट्या छोट्या गोष्टींतून आनंद घेऊ लागलो
अपेक्षा ठेवण्याला मनाने विसरू लागलो
नात्यातला पैश्याचा अदृश्य बंध सैल झाला
तेंव्हापासून आयुष्य सोपे झाले आहेनिसर्गाला मी या स्वर्ग समजू लागलो
त्याला जपण्याचा प्रयत्न करू लागलो
मुक्या प्राण्यांशी स्पर्शाने संवाद मी साधला
तेंव्हापासून आयुष्य सोपे झाले आहेतीर्थक्षेत्र सोबतच मी तीर्थरूपांना वंदू लागलो
वृद्धांशीही मी आपुलकीने बोलू लागलो
लहानात मिसळून मी पुन्हा जगलो बालपणाला
तेंव्हापासून आयुष्य सोपे झाले आहेअडचणीला दुसऱ्यांच्या मी धाऊ लागलो
दीन दुबळयांच्या अश्रुंत मी भिजू लागलो
सलाम ठोकू लागलो इतरांच्याही प्रगतीला
तेंव्हापासून आयुष्य सोपे झाले आहे


संकटाला मी न घाबरता संधी समजू लागलो
धीराने न डगमगता दोन हात करू लागलो
जगू लागलो रोज नव्याने मी या जीवनाला
तेंव्हापासून आयुष्य सोपे झाले आहे.डॉ अमित.11 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad