Bluepadबाप्पा.....
Bluepad

बाप्पा.....

डॉ अमित.
डॉ अमित.
20th Aug, 2020

Share

बाप्पा.....


बाप्पा,आता तुझ्या येण्याचे
लागले आहेत वेध
झाली का तुझी आवराआवर
आता ये लवकर थेट


जग भर सगळीकडे इकडे
पसरला आहे कोरोना
तुझ्या पासून थोडीच का लपल्या
आम्हा सर्वांच्या भावना


माणसातील अंतर वाढले
पण मने जवळ आली
निसर्गाची शक्ती कळली नि
स्वच्छता अंगात भिनली


क्षणभर उसंत नसलेले जग
बरेच दिवस बंद झाले
हवा शुध्द झाली पण
तोंडावर मास्क आले


येवून एकदा आम्हा सर्वांना
कर यातून पूर्ण मुक्त
तुझी गळा भेट घेण्या आम्ही
आसुसलो सारे भक्त


तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
तूच आमचा पालन हार
दहा दिवसाच्या तुझ्या भेटीत
तू दाखव तुझा चमत्कार.

डॉ अमित.

9 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad