Bluepadभेट...तुझी नि माझी होता.
Bluepad

भेट...तुझी नि माझी होता.

डॉ अमित.
डॉ अमित.
18th Aug, 2020

Share

भेट...तुझी नि माझी होता.


तू हात कधीचा माझा
तुझ्या हातात घेतला होता
स्पर्श बोलले सारे मनातले
नेमका शब्दं गोठला होता


वाऱ्यानेही शीळ घातली
श्वासं तुझा ज्यात विरला होता
कानाशी हळूच येऊन माझ्या
तुझे गोड गुपित बोलला होता


सांजवेळेची सोनेरी किरणे
तुझ्या कांतीशी करीत स्पर्धा
उजळत होते क्षणं सोबतीचे
सारा आसमंत उजळला होता


धडधड हृदयाची ही अवचित
दोघांची होत होती जणू सुरात
गात होती गीत आपल्या प्रेमाचे
सोबतीचा निसर्ग बहरला होता


चंद्र नभीचा हे पाहण्या दृश्य
आज जणू प्रकटला लवकर
तुझे रूप न्याहाळून दुरूनच
तो ही मनोमन जळला होता


भेट तुझी नि माझी होता
माझ्या सारखा भाग्यवंत मीच
स्वप्नागत वाटतो मज सारा वेळ
जो मी तुझ्या सव घालवला होता...


डॉ अमित.


14 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad