Bluepad | Bluepad
Bluepad
परी या सम हा
सायली वर्तक
16th Aug, 2020

Share

परी या सम हा

काल संध्याकाळी "महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून रिटायरमेंट" ही बातमी फ्लॅश झाली खरंतर फार आश्चर्यकारक वगैरे ही बातमी नव्हती पण आता तो 7 नंबर चा निळा टी-शर्ट, मैदानात तो येत असताना होणारा जल्लोष, त्याचा तो शांत संयमी चेहरा, त्याची आश्वासक खेळी आता अनुभवता येणार नाही याचंच वाईट वाटलं.
खरंतर धोनी म्हणल की सगळ्यात आधी आठवतात ते त्याचे मानेवर रुळणारे लांब केस मी आणि माझ्यासारख्या अनेक मुलींचा तो क्रश होता त्याची वर्तमानपत्रात आलेली कात्रण आणि त्याचे quotes आजही माझ्या संग्रही आहेत.
२००७ साली त्याने भारताला icc वर्ल्ड कप20-20 जिंकून दिला आणि त्याचा from "crush to idol" हा प्रवास सुरू झाला. खरंतर बहुतांश मुलींना aggresive personality असणारे मुलं, sportsman, हिरो जास्त आवडतात पण कसोटीच्या काळात अत्यंत शांत राहून त्याने खेचून आणलेला विजय आणि विजयानंतरही त्याच संयमी वर्तन याची मुलींनाच काय पण प्रत्येक क्रिकेट रसिकाला भुरळ पडली.
२०११चा वर्ल्ड कप हा तर प्रत्येक भारतीयाचा स्वप्नपूर्तीचा क्षण कॅप्टन कूल ने मारलेला शेवटचा षटकार आणि वर्ल्ड कप वर कोरलेली विजयश्री, ipl मध्ये चेन्नई सुपर किंग्सला त्याने मिळवून दिलेला तिहेरी विजय आणि वनडे मध्येच नाही तर टेस्ट मॅच मध्ये सुद्धा "टीम ब्लू" ला मिळवून दिलेल मनाचं पहिलं स्थान अर्थात या सगळ्या मध्ये ११जणांचं योगदान आहेच पण या ११जणांची योग्य ती निवड करून त्याची मोळी बांधून calculative risk घेऊन अति उत्साहित किंवा निराश न होता यशाची शाश्वती देणारा MSच.
धोनी म्हणल की टीसी कलेक्टर ते कॅप्टन कूल हा प्रवास, हेलिकॉप्टर शॉट, running between the wicket, stumping, catch behind the wicket(ह्या सगळ्या terms कळाल्या त्या निव्वळ त्याचा वरच्या प्रेमामुळे आणि त्याने लावलेल्या क्रिकेट च्या वेडापायी) त्याच्या जाहिराती, त्याच बाईक प्रेम, सतत प्रकाशझोतात असलेलं त्याच खाजगी आयुष्य ते उत्तम बिसनेस मॅन, आर्मी युनिफॉर्म मध्ये त्याने स्वीकारलेला पद्मभूषण, मुलीवर प्रचंड प्रेम असणारा पिता आणि आताचा ऑरगॅनिक फार्मिंग हा त्याचा जीवनपट खरचच रोमांचित करणारा आणि प्रेरणादायी आहे आणि यापुढेही तो असाच सुरू असेल.
तो बेस्ट फिनिशर आहेच हे त्याने काल पुनःश्च सिद्ध केले १५ ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्य दिनी त्याने घेतलेली निवृत्ती आणि इन्स्टाग्राम पोस्ट मधून "मै पल दो पल का शायर हूं !" या गाण्याच्या माध्यमातून त्याने त्याचा उलगडलेला प्रवास.
तर असा हा भारतीय क्रिकेट टीम ला जिंकायला शिकवणारा आणि जिंकायची सवय लावणारा, खूप काही शिकवून जाणारा, शाश्वत विजयाची हमी देणारा एकमेवाद्वितीय MSD सर्वांच्याच मनावर कायमच अधिराज्य गाजवत राहील म्हणूनच
आहेत बहू।
होतील बहू।
परी या सम हाच।
सायली सुधीर वर्तक
१६ ऑगस्ट२०२०


14 

Share


Written by
सायली वर्तक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad