Bluepadबालपणं......... चला पुन्हा होऊ लहान.
Bluepad

बालपणं......... चला पुन्हा होऊ लहान.

डॉ अमित.
डॉ अमित.
16th Aug, 2020

Share

बालपणं......... चला पुन्हा होऊ लहान.


तुम्हाला आवडेल का पुन्हा एकदा लहान होणं?
आता तुम्ही म्हणाल हे काय मी बोलतोय?
असे थोडीचं पुन्हा लहान होता येत कोणाला?निदान या जन्मी तरी ते अशक्य आहे असेच ना?
तर मी म्हणेन का नाही होता येणारं?अवश्य होता येईल.वयाने जरी नाही लहान होता आले तरी मनाने तरी होता येईल की नाही?
वृत्तीने तरी लहान होता येईल की नाही?

लहानपण देगा देवा....मुंगी साखरेचा रवा

'संत तुकाराम' यांना ही लहानपण देवाला परत मागण्याचा मोह रोखता आला नाही.
किती निर्लेप असतो ना आपण लहानपणी?

ते निर्भेळ हास्य..........ते निरागस प्रश्न
छोट्या छोट्या गोष्टीत... ते आनंद शोधणं.


मग असे काय होत मोठं झाल्यावर जे आपण या साध्या साध्या गोष्टी सहजच विसरत जातो.विस्मरण वृद्धापकाळात होतं म्हणतात पण काही काही गोष्टी आपण नकळत स्मृती आड करत जातो.
काम संसार प्रपंच या सगळ्या रहाट गाडग्यात आपण जगणचं जणू विसरून जातो.

आई मला खेळायला जायचयं.. जावू दे ना व......
असे लाडात का होईना आपण नक्कीच आपल्या आईला विचारायचो.या लडिवाळ हट्टाचेही आज एक सुंदर असे गाणं झालंय.
खरं तर संपूर्ण लहानपण हेच अप्रतिम असे गाणं आहे.फक्त मोठं होईल तसे आपण ते गुणगुणने
मागे ठेवत जातो,विसरत जातो.

वाटते मज पुन्हा पुन्हा.......फिरुनी लहान व्हावे,
बडबड गीते गुणगुणत..... बालपण पुन्हा जगावे.
जीवनाचा विरोधाभास पाहा ना कसा आहे.
लहानपणी मोठ्यांच्या काही गोष्टी पाहून आपणही लवकर मोठं व्हावं असं वाटायचं.नव्हे त्यावेळी कधी एकदा आपण मोठे होतो आणि अमुक करू नको तमुक करू नको अश्या नको म्हणत असलेल्या गोष्टी आपण करतो असे होतं.
पण आज तेच मोठेपण,मोठ्या मोठ्या गोष्टी
अगदी छोट्या वाटतात आणि पुन्हा लहान होण्याची स्वप्नं मन बघत राहतं,त्यात पुन्हा पुन्हा रमत राहतं.

संत तुकाराम यांना खरं तर लहानपण याचा दुसरा अर्थ हा अभिप्रेत होता तो म्हणजे आपल्या कर्तृत्वाचा अहं न बाळगता नेहमी मोठेपणा दुसऱ्यांना देणं आणि शक्य तेवढी नम्रता,लहानपण आपल्या अंगी बाळगणे हा होय.


जया अंगी मोठेपण ....तया यातना कठीण.

मग कशासाठी हा मोठे पणाचा अट्टाहास...?
नकोच तो.खरंच नको.हो ना?
मग असं मनाने,वृत्तीने आणि अंतरंगाने लहान होणं,छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणं नक्कीचं आपल्या हातात आहे.

चला होऊ पुन्हा लहान
नव्याने तुम्ही आणि मी ही
चिंचा बोरं आवळे खात खात
आठऊ जुन्या आठवणीही

खेळ खेळू सारे तेच जुने
विटीदांडू लगोर नि गोटया
पकडा पकडी नि बक्का बुक्की
खो खो तर कधी सूर पाट्या

पावसात भिजून पुन्हा एकदा
कपडे करुत चिंब चिंब ओले
चिखलात उडी मारता जोरात
आईचा रपाटा पाठीवर मग बोले

खाऊसाठी घेतलेले पप्पां कडून
ते फक्त मोजकेच चार आणे
नाही सर त्या पैशाला आज
कमविले कितीही नोटा नि नाणे

असू द्यावा आशीर्वाद मोठ्यांचा
नेहमीच आपल्या डोईवरती छान
त्यांच्याकडे पाहून मग वाटते
अजूनही आहोत आपण कायम लहान.
डॉ अमित.


13 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad