Bluepadचिऊचा घास....काऊचा घास.
Bluepad

चिऊचा घास....काऊचा घास.

डॉ अमित.
डॉ अमित.
14th Aug, 2020

Share

चिऊचा घास....काऊचा घास.


लहान मुलं जेवायला तसा खूप त्रास देतात.बहुतांश मुलांची ही तक्रार असते... नव्हे नव्हे त्यांच्या पालकांचीच ही तक्रार असते.
एक बालरोग तज्ञ असल्यामुळे ही तथाकथित समस्या रोजच माझ्या पुढे एकवली जाते.मग माझ्यातला बालरोग तज्ञ हिरीरीने या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो.समस्या तीच जरी वाटत असली तरी त्याची पाळेमुळे वेगवेगळी असू शकतात असे मला वाटते.मग मी ती शोधण्याचा प्रयत्न करू लागतो.

"अलीबाबा" ची गुहा उगडल्यावर जितके आश्चर्य वाटणार नाही तितके मग मला वाटू लागते.
कुणाचं मुलं जेवत काहीच नसतं पण अर्धा अर्धा लिटरच्या वर दूध रिचवत असतं आणि तेही बाटलीने...बाटलीने का तर ते मुलांना पाजने एकदम सोपे.भरली बाटली की लाव तोंडाला.त्या बाटलीचे मग दुष्परिणाम वेगळेच.आता मला सांगा एवढासा जीव मग जेवेल कसा..?पण याच उत्तर काय मिळते ऐकायला ते हे की आमचं बाळ जेवले नाही तर मग मग त्याला कसं उपाशी ठेवायचे?मग पाजा दूध.

दुसरं म्हणजे आजकालची हवा बंद पुडके...
त्याची नावेही हटके... लेज, बिंगो, कुरकुरे..
अशी पुडके च्या पुडके मुलं संपवतात मग जेवायची भूक "छू" मंतर होवून जाते,हवा होवून जाते आणि मुलं मग कुरकुरे सारखीच वाळकी राहतात हवा आली की उडतील की काय अशी.
तेच झालं बिस्किटांचे त्यात असतो मैदा,सोडा बेकिंग पावडर तिन्ही गोष्टी पोटासाठी खूपच घातक.अश्या गोष्टी जर मुलं आवडीने खात असतील तर मग जेवतील कसे ही मुलं.
मग सुरू होतो मुलांनी जेवणासाठी चिऊ काऊ चा खेळ.
ही 'जंक' फूड मुलांच्या भुकेला 'गंज' चढवतात.
पूर्वी गुळ शेंगदाणे फुटाणे असेच होते मधल्या वेळेतली भूक शमवायला. का नाही तुम्ही त्या मुलांना देवू शकत पूर्वी सारखे आताही.
त्यातील पौष्टीक घटक बाळाला वाढीला मदतच करतील.
पण मी म्हणतो मुलांना भुकेची जाणीव तर होवू द्या.कडकडून भूक काय असते हे त्यांना कळू तर द्या.त्यांना टीव्ही मोबाईल वरील गेम न खेळू देता मोकळ्या हवेत खेळू द्यात.हाच त्यांचा व्यायाम नी हीच त्यांची कसरत...
तुम्ही आपल्या मुलांना घरी बनवलेल्या गोष्टीचं शक्यतो देण्याचा प्रयत्न करा..त्या आहारात सातत्याने बदल करून वेगवेगळ्या पद्धतीने मुलांच्या आवडीचा विचार करून देण्याचा प्रयत्न करा.त्यांना आपल्या सोबत जेवताना घेवून बसा.किमान एक वेळचे जेवण घरातील सर्व मंडळी मिळून करा.आपल्या ताटातील घासच त्याला एक घास चिऊचा एक घास काऊचा असे भरवा.असे करता करता मग तुमचं पाखरू नव्हे कोकरू हि मग आनंदाने जेवेलं तृप्त होईल...
मग ना त्याला कुठले टॉनिक लागेल ना कुठली औषधे..तुमचे प्रेमच त्याचं टॉनिक होईल नी तुम्हीच त्याचे आहारतज्ञ.

चिऊ काऊ चा घास भरऊ
प्रेमाने आपल्या बाळास
लेज कुरकुरे बिस्किटे ठेवू
मुलांपासून दूर चार हात
चॉकलेट ला देवू हक्काची विश्रांती
गुळ शेंगदाणे चिक्की ची
करू त्यांच्या आयुष्यात गिनती
मोबाईलचे गेम देऊ सोडून
खेळ खेळू देवू मैदानी त्यांना
वाऱ्या संगे सायकल पळवून
घामाने चिंब भिजू द्या मुलांना
छान छान गोष्टी ऐकत ऐकत
बाळसे धरतील मुले जोमात
चिऊ काऊही हसतील मग
हळूच गालातल्या गालात
खुश होतील मनातल्या मनात.डॉ अमित लाड.
बालरोग तज्ञ.

16 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad