Bluepad | Bluepad
Bluepad
प्रिय मैत्रीण
ऋतुजा चव्हाण..
13th Aug, 2020

Share

सा. न.वी.वी.
पत्र लिहिण्यास कारण की खूप दिवस झाले आपली भेटच झाली नाही. कोरोणा आला न त्याने पुन्हा एकदा माणसाला जिवंत केले. एकंदरीतच काय माणसाला ज्या भावना होत्या त्या प्रकट पण करायच्या असता हे तो विसरला होता यानिमित्ताने ते जाणवले .मग मी ठरवले आता पत्रच लिहायचे. लहानपणी पत्र, निबंध शिकलो पण त्याचा उपयोग केवळ परीक्षेत च होतो अस वाटायचं पण आज मात्र वाट्ले या डिजिटल च्या काळात बघू जरा वेगळा प्रयोग करून आवडल तर आवडल! अर्थात आवडणारच हे मला माहीतच आहे कारण सोबत असताना लहानपणीच्या गोष्टी काय कमी उगळायचो.तेव्हा तर आपण कॉलेज मध्ये होतो पण सोबतचे साथीदार च असे होते की त्यांनाही तेच आवडायचं. प्रोफेशनल कोर्सला गेलो होतो पण खट्याळपणा प्रत्येक जणा मध्ये होतें त्यामुळे च आपण एकमेकांच्या जास्त जवळ आलो होतो.
सोबत असताना अस जगून घेतले ना की जीवनात पुन्हा जगण्यासाठी आठवणीच पुरतील. बर हे झालं कॉलेज मध्ये आता होस्टेलमध्ये का याच्या पेक्षा वेगळे होतो.काय काय करायचो आपण पण जोडीला अभ्यासाचं नाटकही चांगलाच जमून यायचं.नाटकच ते त्यामुळे कितीजण आपल्यावर फिदा व्हायचे ना आज त्या आठवणीने पण आपण हुशार होतो याची पावती मिळते.आपला कोर्स असा होता की जणू आपल्याला हॉस्टेल जीवनावर ph.d करायची होती.किती सारे जण आले नी गेले आपण मात्र तिथेच.पण मज्जा आली अनेक अनुभवाशी ओळख झाली.आता हे ही अनुभव सांगायचे झाले तर अवघड होईल.ते ही सांगेल पण पुढील पत्रात.
घरी सांगायचं झालं तर सर्व मज्जेत.आताच सर्दी झाली आहे . घरी नाही वाट्ले तरी भीतीच वातावरण आहे. साधी सर्दी हो पण तिलाही कोरोनाने आपल्यापासून तोडले. लहानपणापासून ती सोबत असायची कधी भीती नाही की कधी बाऊ केला नाही हो! .जशी यायची तशी जायची हो पण आता मात्र तीही जरा बिचकुन च असते. सर्दी सोबत खोकला ही असायचाच की पण मज्जा यायची . हळूहळू बदलत जाणारा आवाज न त्यासोबत बाकीच्यांची सहानभुती हेच औषध असायचं .पण मज्जा येते आज सर्व काही नसतानाही मला हे आठवते हे विशेष.
...........कळवावे
तुझीच मैत्रीण

7 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad