Bluepadश्रावण...
Bluepad

श्रावण...

Dr.Anil Kulkarni
Dr.Anil Kulkarni
12th Aug, 2020

Share

श्रावण.
श्रावण म्हणजे भावभावनांचा सुखद क्षण
काळरात्र नंतर येणारा उष:काल
ऊन-पावसांचा मिलाप क्षण
पृथ्वीच्या सजण्याचा, नटण्याचा क्षण
हिरवा शालू नेसण्याचाक्षण
पृथ्वीनं ल्यालेलं मलमली तारुण्य
क्षणात आहे क्षणात नाही
मनातल्या नभात इंद्रधनू अवतरणं
दुष्काळावर अत्तर शिंपडणं


पावसाच्या सरी बरसताना ती आठवणं पावसाच्या सरी बरसताना ती आठवणं
जिवनात ही घडी अशीच राहू दे वाटणं
प्रत्येकाच आकाश असतं
प्रत्येकाचा श्रावण असतो
मनाचाही श्रावण असतो
मनाचा गुलमोहर झाला की श्रावणच असतो.
डॉ. अनिल कुलकर्णी

15 

Share


Dr.Anil Kulkarni
Written by
Dr.Anil Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad