Bluepadमानसिकता.......बालक आणि पालक नात्याची.
Bluepad

मानसिकता.......बालक आणि पालक नात्याची.

डॉ अमित.
डॉ अमित.
12th Aug, 2020

Share

मानसिकता.......बालक आणि पालक नात्याची.


लहान मूलं हे प्रत्येकाच्या घरातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो.घरात लहान मूलं झालं की संपूर्ण कुटुंब जणूं आनंदाचे झोके घेत असते.परंतु पालक म्हणून वावरताना आपल्या असे लक्षात येत की हे म्हणावं तितकं सोपंही नाही.
मूलं हे वाढतं असतेच पण ते वाढत असतानाच आनंदी वातावरणात घडविणे हेही तितकेच महत्वाचे असते.
लहान मूलं हे भावी पिढीचे संस्कारक्षम मूळचं असते.जेंव्हा मूलं मोठे होत असते तेंव्हा पालक म्हणून आपणही जास्त अनुभवी ,सक्षम होत असतो.पालकांनी ही गोष्टं कायम लक्षात ठेवायला हवी की आनुवंशिकतेचा नियम आपल्या पाल्याला नक्कीच लागू होणार.आपली पाल्ये आपल्याशी मिळती जुळती असणार.
पण व्यक्ती म्हणून ती पूर्ण स्वतंत्र आहेत हेही विसरता कामा नये.
पालकत्व हा एक अनुभवसिद्ध अखंड प्रवास असतो. 
त्यात शास्त्र व कला यांचा मिलाफ असतो.
पालक या शब्दाची उकल जर करावयाची झाली तर

पा--पालन करणारा
ल--लक्ष देणारा
क--कर्तव्य पार पाडणारा.

असे करता येईल.

पूर्वीचे बालक पालक आणि आताचे बालक पालक यात खूपसा फरक आहे.त्याला जनरेशन गॅप हे गोंडस असे नाव दिले गेले आहे.पूर्वी साधारणतः १० वर्षाचा फरक दोन पिढीत हा जनरेशन गॅप समजला जायचा.पण सध्या हा गॅप ३ वर्षांवर आलेला दिसतोय.पूर्वी मोठ्यांचा आदर करणे,त्यांच्या शब्दाबाहेर न जाणे असे मूलं असणे हे आदर्श पालकत्वं समजले जायचे.

आता ही परिभाषा बदललेली आहे.
आता मुले पालकांचे ऐकत नाहीत,हट्टीपणा करतात,अभ्यासाला एका जागी स्थिर बसत नाहीत मोबाईल ,गेम्स टीव्ही,इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या सतत संपर्कात राहतात अश्या बऱ्याचं आणि इतरही काही समस्यांना सध्या पालकांना तोंड द्यावे लागत आहे.

आपले मूलं वाढवताना आपणही कधी बालक होतो याचा विसर पालकांना पडता काम नये.
आज आपण बालक आणि पालक यांच्यात असणाऱ्या विविध समस्यांचा आणि त्यावरील मार्गांचा नव्याने आणि वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहोत.
पालक आणि बालक यांचा सूर जुळणे खूप महत्वाचे आहे.
हा सूर जुळवण्यासाठी काही उपयुक्त गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे.

मिले सूर मेरा तुम्हारा,तो सूर बने हम्हारा.


मि- आपण जेंव्हा मुलांसोबत असतो तेंव्हा नेहमी आपला मी पणा सोडून रहा.
वर्तमानात रहा.
कारण मुले नेहमी वर्तमानात जगतं असतात.त्यामुळे ती नेहमी आनंदी राहतात.
आपण मात्र भूतकाळातील घटनांमध्ये घुटमळत किंवा भविष्यकाळाचा विचार करत आजचा वर्तमान काळ गमावून बसतो.

मुलांशी अधिकारवाणीने बोलू नका.
त्यांना समजावताना सम पातळीवर जा. म्हणजेच मुलांशी मुलांप्रमाणे संवाद साधा.
कारण आजकालच्या सर्व समस्यांचे मूळ हे बालक आणि पालक यांच्यात कमी होत चाललेला संवाद हे आहे.
सारखं सारखं मी लहान असताना असे होते तसे होते ही आणि अशी उदाहरणे त्यांना देवू नका.


ले--लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात.
तेंव्हा पालकांनी प्रथम स्वतःचे वर्तन सुधारणे,
स्वतः तणावमुक्त राहणे गरजेचे असते.
स्वताच्या चुका प्रामाणिकपणे मान्य करणे.
आपण इतरांशी कसे वागतो या सर्व गोष्टीं मुलं आपल पाहतचं शिकत असतात.
महाराज उदाहरण.
आजकी पिढी सिखानें से नहीं दिखानें से सिखती हैं.

सू--सकारात्मक बोला.

नेहमी सकारात्मक बोलणे गरजेचे असते.
तुला काय येतंय?तुला हे नाही जमणार.असे नकारात्मक बोलणे नेहमी टाळायला हवे.
लहान मूलं हे चुकांतूनच शिकणार असते.
लहान मुलांच्या भावनांचा आदर करा.

सतत दोष बघणे टाळा.
मुलांच्यातील गुण ओळखा.त्यांना प्रोत्साहन द्या. कौतुकाचे दोन शब्दं मनापासून बोला.
फक्त यश आणि अपयश या पलीकडे जावून बोला.
 र-- रागावर नियंत्रण ठेवा.

रागाला नियंत्रित कसे करायचे हे मुलांनाही शिकवा.
शांततेशी त्यांची ओळख करून द्या.
प्रमाणापेक्षा जास्त राग,आक्रमकपणा जर मुलांत असेल तर बालमानसशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

मे--मित्र व्हा.

पालक हा मुलांचा पाहिला मित्र असतो.
त्याच्याशी खेळा.

मुलांना पैश्यांपेक्षा अधिकाधिक आपला वेळ द्या.

रोज कमीत कमी १५ मिनिटे मुलांशी अनौपचारिक बोला. त्यांना बोलण्याची संधी द्या.
त्यांचे ऐकून घ्या.
प्रेमानं जाणीवपूर्वक केलेला स्पर्श हा यासाठी जिवंत सेतु आहे.
या पालक मैत्री मुळे मुले त्यांना काही अडचण आलीच तर सर्वात प्रथम ते तुम्हाला सांगतील.

त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करा.

वर्तमान पत्र,छानं छानं गोष्टींची पुस्तके वाचण्यास द्या.स्वतः वाचून त्यातील रंजक भाग मुलांना सांगा.


रा--रूटीन बदला.

रोजच एकचं एक गोष्ट केली तर कंटाळा येतो.
रोप लावून त्यांची निगराणी करायला सांगा.
बागेत,निसर्गाच्या सान्निध्यात जावा.
संगीत ऐका.त्यावर ताल धरा.मनसोक्त नाचा.


तु-- तुलना करू नका.

क्लास मधील मुलांशी,मित्रांच्या मुलांशी,त्यांच्या मित्रांशी कधीही तुलना करू नका.
प्रत्येक मूलं हे स्वतंत्र व्यकतिमत्त्व असते.
प्रत्येक मूलं कशांत ना कशांत तरी वेगळेपण घेवून आलेले असते.

म्हा--माहिती तंत्रज्ञान,सोशल मीडिया याचा अतिरेक नको.आवश्यक आणि विश्वासाहर्त माहिती मिळवा.त्याचा भडीमार नको.

डिजिटल उपवास...म्हणजे एक दिवस मोबाईल टीव्ही कॉम्प्युटर या ग्याझेट्स ना सक्तीची विश्रांती द्या.
अमेरिकन गृहिणी जेनेफर ने मुलाला वयाच्या तेराव्या वर्षी I phone देताना काही अटी घातल्या त्या खूपच परिणामकारक आणि आजच्या परिस्थितीला अनुसरून आहेत असे मला वाटते.

रा--रास्त अपेक्षा ठेवा.

आपल्या मुलाने नेहमी पहिला नंबर मिळवावा,सर्व खेळांत नैपुण्य मिळवावे. हे चूक आहे.
त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्या.
हरणे किंवा जिंकणे समान पद्धतीने स्वीकारणे त्यांना शिकू द्या.
आपल्या सुप्त आकांक्षा,अपेक्षा मुलांवर लादू नका.
मुलांच्या क्षमता ओळखा त्यांना प्रोत्साहन द्या.तो--त्याग किंवा देण्यातले सुखं समजावून सांगा.वस्तू शेअर करायला शिकवा.
अनाथाश्रम किंवा इतर गरजूंना, नव्या न वापरलेल्या वस्तू देण्यातले समाधान काय असते हे त्यांना अनुभवू द्या.
त्यामुळे त्यांना स्वतःच्या वस्तूंची किंमत कळेल.
त्या ते जपून वापरतील.

सू-- सत्य बोलायला शिकवा.
आपले मूलं खोटं बोलत असेल तर वेळीच त्याची पाळेमुळे शोधा.
सत्याची ताकत समजावून सांगा.

र-- रोजनिशी लिहायला शिकवा.स्वतः त्यांच्यासोबत लिहा.
सहा ते सात वर्षाच्या पुढची मुले स्वतःच्या कल्पनेने लिहू शकतात.त्यांना लिहून व्यक्त होवू द्या.
त्यामुळे त्यांचे मन विचार करायला लागते.
भाषिक कौशल्य सुधारते.
हस्ताक्षर सुधारण्यास मदत होते.
स्थिरता येण्यास, एकाग्रता वाढण्यास मदत होते.

ब--बदल याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचे शिकवा.
आपल्या आयुष्यात बदल हीच एकमेव अशी गोष्ट आहे की जी कायम असते.

ब्रेक घ्या....संपूर्ण दिवसाचा.

यामुळे मुले आणि तुम्हीही कृतिशील होता,
ताजेतवाने होता.
कधी कधी काहीही न करणे हे ही तुमच्यासाठी कृतिशील होण्याचे पाहिले पाऊल असते.
हा ब्रेक आपण का घेतला आणि त्याचे काय फायदे होतील हे मुलांना समजावून सांगा.

ने-- नाही ऐकण्याची सवय राहू द्या.

प्रत्येक हट्ट पुरवू नका.
सततच्या मागण्या मान्य करू नका.
आमच्या लहानपणी आम्हाला नाही मिळाले मुलांच्या नशिबाने त्यांना मिळतं तर का नको द्यायला असा विचार करू नका.
त्यामुळे त्यांना नकार स्वीकारण्याची सवय होते.
यामुळे अपयश पचवण्याची ताकद मिळते.दृष्टीकोन बदलतो.

ह--हवापालट..

एक छोटिशी ट्रिप किंवा पिकनिक ला जा.गडकिल्ले ऐतिहासिक स्थळे,बगीचा यांना भेटी द्या.

मा- मानसिक समस्या.

आपले मूल इतरांपेक्षा वेगळे वागत असेल तर तुम्ही स्वतःला तो प्रश्न विचारा.उत्तर हो असले तर बालमानसशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

ADHD
LD.
Slow learners
Dyslexia
Autism
Low vision
Depression.

असे बरेच लहान मुलांतील आजार आपण तज्ज्ञांच्या सल्ल्याने ओळखू शकतो,त्यावर योग्य वेळी योग्य तो सल्ला घेवू शकतो.


रा--राहिलेलं सगळे मुद्दे

मुलांचा आहार...

बेकरी प्रॉडक्ट्स नको
जंक फूड नको
घरी बनविलेले...
सर्वांनी मिळून एक वेळचे जेवण एकत्र घेणे.

शिक्षा....
आजकाल मुलांना मारणे किंवा शिक्षा करणे याचा फारच उलटा अर्थ घेतला जातो.
छडी लागे छमछम विद्या येई घमगम.
शाळेत पालकांकडून शिक्षकांना तंबी दिली जाते की आमच्या मुलांना मारायचे नाही..
योग्य वेळी योग्य शिक्षा हे मुलांच्या संस्कारात
महत्वाची भूमिका निभावत असते.
Kindness with firmness.


मूलांच्या परिक्षा..

खरे तर पालकांच्या अपेक्षांमुळे मुलांना परीक्षेची नव्हे, तर निकालाची भीती वाटत असते. निकालाचा दिवस हाच खरा त्यांच्यासाठी परीक्षेचा दिवस ठरत असतो.

चल मी तुझा अभ्यास घेतो असे न म्हणता चला आपण अभ्यासाला बसूयात असे म्हणा.

मुलांची अभ्यासातील अडचण ही फक्त मुलांची नसून आपली आहे आणि आपण दोघांनी मिळून ती सोडवायची आहे, असा दृष्टिकोन पालकांनी ठेवला पाहिजे. त्यातूनच विद्यार्थ्यांची उमेद वाढण्यासाठी मदत होईल. पालकांनी मुलांच्या यशापयशात वाटेकरी होण्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. मुलांसोबत शिकण्याचा निखळ आनंदही मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलाला समाजून घेताना आपल्यात लपलेले मुलंही ओळखलं पाहिजे.

मुलांच्या आत्महत्या...व्यसनाधीनता

अवाजवी अपेक्षा,वाढती जीवघेणी स्पर्धा,मुलांमधील वाढती गुन्हेगारी,नैराश्य या सर्व गोष्टीमुळे कुमार वयातील मुलांमध्ये आत्महत्या,व्यसनाधिनाता या सारख्या गोष्टींचे प्रमाण वाढत आहे.

सुजाण पालकतव...
याविषयी खलील जिब्रान याने खूप समर्पक शब्दांत सांगितले आहे ते असे की
पालकत्व हे डोळ्यांच्या पापण्यां प्रमाणे असावे जे डोळ्याचे रक्षणं तर करतेच पण आतील स्वप्नांना धक्का न लागू देता.तसेच आपण आपल्या मुलांना घडवताना त्यांना वाढविले पाहिजे.

गम्मतशाळा...
हा एक नवीन आणि सुंदर संकल्प आहे.
मुलांना पाठ्यपुस्तक ऐवजी प्रयोगातून, खेळातून,निरिक्षणातून,स्वअनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात.
त्याचा दोन दिवसांचा कोर्स असतो.मला वाटतं हा आपल्यातील जास्तीत जास्त जणांनी करावा जेणे करून फक्त आई वडील यांच्यासाठी हे पालकत्वं मर्यादित न राहता सामाजिक पालकत्वं ही संकल्पना दृढ होण्यास नक्कीच मदत होईल.


मी तुम्हाला या ज्या गोष्टी किंवा मुद्दे सांगितले हे जर आपण आपले मूल वाढवताना अमंलात आणले तर नक्कीच तुम्ही आणि तुमची मुले यांचा सूर नक्कीच जुळेल.

मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा....
गीत गुणगुणतच आपले बालक पालक हे नाते आणखीन दृढ होईल.

चला तुम्ही आणि मीही या ओळी गुणगुणतच आजच्या या विषयाचा निरोप घेऊ,बरोबर की नाही?

छोटंसं काव्य....बालक पालक या नात्यावर

पालक म्हणून मुलं वाढवताना
आपणच नव्याने घडत असतो
वेगवेगळ्या गोष्टी परत पुन्हा
मुलांसोबत शिकत असतो
ती भाराभार मुलांची निरागस प्रश्ने
शोधताना उत्तरे त्यांची
स्वतःच स्वतःला गवसत असतो
पालक म्हणून मुलं वाढवताना
आपणच नव्याने घडत असतो
त्यांच्याशी खेळ खेळताना
आपलं बालपणं उलघडतं असतो
पालक म्हणून शाळेत जाताना
पुन्हा जुने दिवस आठवतं असतो
तो बालहट्ट पाहून त्यांचा
मनात कुठेतरी सुखावतं असतो
त्यांच्याशी कठोर वागताना
मनातून मात्र दुखावतं असतो
त्याचा नि आपला घट्ट मैत्री-बंध
दोघांच्यातल नातं खुलवतं असतो
पैश्या पेक्षा त्यांना आपला वेळं देणं
हा सर्वात मोठा उपहार असतो
पालक म्हणून वावरताना मी
पुन्हा बालक म्हणून बागडत असतो
मी मी न राहता त्याच्यासंगे
फिरुनी परत जन्मं घेत असतो
पुन्हां पुन्हां जन्मतं असतो.....


डॉ अमित.
बालरोग..नव्हे बाल आरोग्य तज्ञं.


17 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad