Bluepad | Bluepad
Bluepad
प्रतिबिंब
J
Janhavi kali
10th Aug, 2020

Share

जरा आरशात बघा!! मटकू नका. जरा स्वतः कडे बघा. प्रतिबिंब डोकावत आहे ना!! बघा जरा नीट काहीतरी सांगू पाहत आहे ते. बहुतेक त्याला कुठेतरी असह्य झाला आहे, कुठेतरी स्वतःचीच भीती वाटायला लागली आहे. आता आर्षा समोरून जरा बाजूला व्हा ते प्रतिबिंब म्हणजे तुमचं मन आहे.

त्या मनात इतक्या असंख्य गोष्टी दडल्या आहे की त्या मनाला आता असह्य होत आहे. कुठेतरी कोंडल्यासारख होतंय.त्या मनाला थोडं मोकळे होऊ दे. विचारांना कधी वाट फूटू दे. पण मन हे मन असतं शेवटी ते थोडथोड करूनच मोकळ होत राहतं.पण आपण व्यक्त होतो तर बाहेरच्या समाजाला वाईट वाटतं.मन दुखतात पण कधी लोकांचाही विचार करत जा प्रत्येक वेळी मनात दडवून ठेवणं शक्य नसत. लोकांनाही ते जमत नाही.
कधीकधी खरंच वाटतं की कुठेतरी निघून जावं अगदी शांत ठिकाण जिथे फक्त आपण असो समाजाच्या प्रतिक्रिया नसतील ते कौतुक नसेल त्यांच्या बोलण्यापासून दूर अगदी दूर. कारण सध्या कोंडी होते की आपण आपल्यालाच सापडत नाहीये. कुठलीही गोष्ट करताना आधी लोक काय म्हणतील हा विचार आधी येतो. खरंच एवढच असेल तर तुम्हीच (लोक) माझा आयुष्य चालवा रोबोट सारखं. मग ते अजून मोकळेपणाने सांगता येईल असं कर तसं करू नको.

रोबोट एक खरंच सगळ्यांत सुखाचा आविष्कार आहे ज्याला भावनाच नाही!! तो फक्त त्याला दिलेल्या आदेशांचे पालन करत असतो.लोकांनी खरंच आपल्याला रोबोटा समजला जस सांगतील तसच वागायच स्वतःच्या इच्छा मारून जगायचं. आणि आपण जर बोललो तर आपणच वाईट आपलंच तोंड दिसतं.

शेवटी काय लोक आहेत लोक आता बोलणारच ही हाक जेव्हा आतुन तेव्हा ते प्रतिबिंब शांत आणि समाधानी दिसत. मग ते प्रतिबिंब सारखं सुरेख आणि छान असेल .त्यामुळे दुसऱ्याच्या बोलण्या कडे जास्त लक्ष न देता जे आपलं मन मानेल तस वागा कारण तुम्ही फ्रीडम मध्ये जगताय सगळ्या बाजूंनी तुम्हालाच लढायांचा आहे. लोका नाहीं येत
प्रतिबिंब
जेव्हा आपण एकटे असतो शेवटी आपल्या सोबत एकच व्यक्ती असते ते म्हणजे आपलं मन आपलं प्रतिबिंब

11 

Share


J
Written by
Janhavi kali

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad