जागतिक मातृदिनानिमीत्त प्रस्तुती
**** ते सुंदर जग म्हणजे आई असते****
* मुलांच्या विश्वात रमण्याची तिला घाई असते, सुख-दुःखात साथ देणारी ती ताई असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते*
*नवऱ्याचे विश्व समृद्ध करणारी ती बाई असते, संसारासाठी जीव ओवाळणारी ती माई असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते*
*जिच्यामुळे कुटुंब एकरूप होते अशी ती साई असते, मातृत्व सफल करणारी ती एक दाई असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते*
*छत्रछाया देणारी ती भारवाही असते,
कुटुंबाचा आधारवड होणारी ती सावली असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते*
*आंधळ्याचे डोळे तर लंगड्याची पाय असते,
दुधाची साय तर गाईची माय असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते*
*हंबरड्याचा पान्हा तर कुटुंबाचा कणा असते, पडणाऱ्याचा टेकू तर उधळणार्याचा वारा असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते*
*पावसातली गार तर जीवनाचे सार असते,
वादळं सोसूनही आनंद देणारे भांडार असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते*
*मातीशी इमान राखणारी ती भूमाता असते,
सेवा,समृद्धी,त्यागाची ती मूर्तिमंत रूप असते,
ते सुंदर जग म्हणजे आई असते*
@ दीपक केदू अहिरे, नाशिक