Bluepadअबोल वृक्ष 🌳📝
Bluepad

अबोल वृक्ष 🌳📝

ऋतुजा चव्हाण..
9th Aug, 2020

Share

आज दुपारी मी निवांत बसली . सहज खिडकीत लक्ष गेले . घरासमोरील अगदी रस्त्यावरच महानगरपालिकेमार्फतच लावलेले हे रोपटे आता ४-५ वर्षात जणू वृक्षात रूपांतर झाले होते . तिन्ही ऋतुत त्याने आपल्या अंगावरील हिरव्यागार पानाचा कधी त्याग केला नाही जणू निसर्गाकडूनच त्याला हे वरदान मिळाले. यावर्षी नेमके लॉकडाऊन मुळे बराच काळ घरी राहता आल.आज मी पाहत होते झाडाला छोटी छोटी फळ लागली होती .या फळांनी झाड बहरून गेलं होते. इतके सुंदर दिसायचं हे झाड जणू हिरवी पाचूच जनू ते . घराच्या गच्चीवर गेल्यावर तर ते हलकेच हातात यायचं .मनात यायचं की इथेच बसून राहावं . एक नैसर्गिक सुखच जणू भेटायचं. आजच्या काळात तर अस वाटतेय आपण खूप काही गमावले आहे.लहानपणी आपण अगदी आजोबांच्या अंगाखांद्यावर खेळावं तस झाडावर खेळायचो. आज मात्र सगळच हरवलंय राहिल्यात फक्त आठवणी. आज मात्र उदास वाटत होते राग येत होता सगळ्याचा. झाड लावण्याची गरज असताना झाड तोडली जातात. तोडताना जेव्हा झाडाच्या फांद्याचा आवाज येत होता तेव्हा माञ उदास वाटत होते. मला वाटते सर्वच झाड तोडणार पण काही फांद्याच तोडल्या हे पाहून माझे मन सुखावले.😃

8 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad