Bluepadउसंत मानवी मनाला📝
Bluepad

उसंत मानवी मनाला📝

ऋतुजा चव्हाण..
9th Aug, 2020

Share

प्रत्येक जण त्याच्या आयुष्यातील सुखाचे ,आनंदाचे, यशाचे क्षण अगदी चवीने सांगत असतो पण हेच यश येण्यापूर्वी त्याने अनेक समस्यांना तोंड दिलेले असते तेव्हाच त्याला यश पचवता येते हे माञ तो विसरतो न मग त्याला अस वाटते की आयुष्यातील समस्या ही नकारात्मकता(nigativity) आहे. पण सकारात्मकता(positivity) पण तेव्हाच जवळ येते जेव्हा आपण नकारात्मकता दूर करण्यात यशस्वी होतो म्हणून जेव्हाही यशाचा विचार करू तेव्हा समस्या पण स्वीकारा मग परिणामाची चिंता करण्याचे काही कारणच उरणार नाही. आज असे वाटते की लोक दुःख, निराशा यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात पण याला न घाबरता लढायला शिकायला पाहिजे . या जगात प्रत्येक जण एकटाच आला आहे तर त्याने एकट्यानेच लढायला शिकले पाहिजे ही भक्कमता सर्वामध्ये निर्माण होवो मग कशाला होतील हो मानसिक आजार.. सर्व असूनही ज्याला एकटेपण खायला उठते त्याने माञ खरंच आपल्यातील समस्यांना सामोरे जायला पाहिजे.त्याला संयमाने हाताळायला पाहिजे कारण समस्या आपल्यात आहेना मग उत्तरही आपणच शोधणार आणि ते आपल्याला निश्चितच सापडते आणि नाहीच सापडले तर आपल्या सभोवताली मानव रुपी देव आहेतच की आपल्याला सहकार्य करायला ..🤗

6 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad