Bluepadआयकॉन...........की मी कोण?
Bluepad

आयकॉन...........की मी कोण?

डॉ अमित.
डॉ अमित.
9th Aug, 2020

Share

आयकॉन...........की मी कोण?

आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला घवघवीतं यश मिळवण्याची,आपापल्या क्षेत्रात शिखरावर पोहोचण्याची जणू तीव्र अशी आकांक्षा असते.प्रत्येकाने आपल्या नजरेसमोर कोणी एक असा "आयकॉन" ठेवलेला असतो.तो आयकॉन त्याच्या स्वतःच्या आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचलेला असतो. त्यासाठी त्याने अफाट मेहनत देखील केलेली असते...पण प्रत्येकालाच त्याच्या सारखे यश मिळवता येईल असे कदापि नसते...हे जरी कटूसत्य असले तरी आपण हार मानायची नसते..धीर सोडायचा नसतो.
दर वेळी जिंकणे म्हणजे पहिला येणे नव्हे.
पूर्वी पेक्षा अधिक सरस होणे हे देखील जिंकण्या इतकेच कदापि त्याहून जास्त महत्वाचे असते..
आयकॉन म्हणजेच प्रेरणास्थान...आयकॉन या इंग्रजी शब्दाची उकल मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करेन... आय...म्हणजे मी...कोण?
एखादी प्रतिष्ठित व्यक्ती प्रेरणास्थान असणे चुकीचे नाही...पण त्याच्या सारखे होण्याच्या नादात आपण आपले स्वत्व विसरणे...हे बिल्कुल मान्य नाही...

त्यापेक्षा मी कोण?हा प्रश्न स्वतःला विचारून,
स्वत:च्या क्षमतांना पूर्णपणे ओळखून,आपली स्पर्धा आपल्या स्वतःशीच करून आपल्यात क्षणांक्षणांला सुधारणा करीत जाणे हे खूप गरजेचे असते...

मला हेच म्हणायचे आहे की तुमच्या साठी सर्वात पाहिला आयकॉन जर कोणी असावा तर तो आहे तुम्ही स्वतः.... त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतः वर पूर्ण विश्वास असणे,तुम्ही तुमची निर्णय क्षमता वाढविणे,घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणे, यदा कदाचित अपयश आलेच तरी न डगमगता नव्याने भरारी घेणे तितकेच गरजेचे असते.


माझ्यातल मी'पण जेंव्हा... बाजूला ठेवून
स्वतःच्या क्षमतांना..... पूर्णपणे जाणून

आयुष्याच्या वाटेवर.....ध्येयाच्या दिशेने
मी एक एक पाऊल पुढे...टाकले खुशीने

मी जेंव्हा ओळखले...पूर्णपणे मला
यशाचा एक वेगळाच मार्ग....हा गवसला मला.तुम्हाला एक साधं उदाहरण देतो...एका बागेत दोन झाडे शेजारी शेजारी लावली.. त्यातले एक होते नारळाचे आणि दुसरे आंब्याचे...जर आंब्याच्या झाडाने ठरवले की मला नारळाच्या झाडासारखे उंच व्हायचे आहे आणि त्याने आपल्या सर्व फांद्या काढून टाकल्या तर काही उपयोग होईल का?कदापि नाही उलट आहे ते झाड निरुपयोगी होईल.
"एम एस धोनी" या चित्रपटात धोनीचा जिवलग मित्र एका बॅट कंपनीच्या मालकाला धोनीची प्रशंसा करीत असतो..तेंव्हा तो मालक त्याला विचारतो धोनी हा काही तेंडुलकर लागून गेला आहे का की ज्याच्या साठी मी ब्रॅण्डिंग करावे.तेंव्हा धोनीचा मित्र त्याला म्हणतो नाही तो तेंडुलकर नाही पण "धोनी हा धोनी" च आहे.त्याची स्वतःची एक वेगळी पद्धत आहे खेळायची, स्वतःचा वेगळा छाप आहे....किती समर्पक असे उत्तर देतो तो त्या बॅट कंपनीच्या मालकाला,हो की नाही?
आपण प्रत्येक जण त्या ईश्वराची एक अनमोल कलाकृती असतो...गरज फक्त इतकीच आहे की आपण त्या कलाकृतीतून अनावश्यक असलेला भाग काढला पाहिजे...त्यावर चढलेला अभिमानाचा,अहंकाराचा,संपत्तीचा आणि अनावश्यक अपेक्षांचा थर उतरवला पाहिजे.
यशापर्यंत पोहोचणे हे महत्वाचे आहेच पण यश मिळवताना केलेल्या अथक परिश्रमाचे,त्या सर्व प्रक्रियेचे मोल किंबहुना त्याहून अधिक महत्वाचे आहे.जेंव्हा जेंव्हा आपण करत असलेल्या कुठल्याही कामात आपण आपले सर्वस्व देतो,आपले पूर्णत्व देतो तेंव्हा तेंव्हा ते काम फक्त काम न राहता ती एक पूजा होते...आणि या पूजेचे चांगले फळं तुमची मन लावून वाट पाहत असते..तुमची एक वेगळी ओळख निर्माण करत असते.

तेंव्हा असा....स्वतःचा आयकॉन स्वतः होणे आवडेल का तुम्हाला?मला वाटतं नक्की आवडेल..आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न पण नक्की करणार,हो की नाही?

स्वतःशीच स्पर्धा माझी...
स्वतःशीच माझी चांगली मैत्री..
मीच माझा खरा आयकॉन
माझ्या क्षमतेची मलाच जास्त खात्री.


डॉ अमित.


20 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad