Bluepad | Bluepad
Bluepad
भिंती पाडा........पूल बांधा.
डॉ अमित.
डॉ अमित.
8th Aug, 2020

Share

भिंती पाडा........पूल बांधा.अरेच्चां हे काय नवीनचं....
म्हणे भिंती पाडा पूल बांधा.
हो हो सांगतो सगळं....पण टप्प्या टप्प्याने.

आजकाल माणसां माणसांतला संवाद खूपचं कमी होत चाललाय.आपण प्रत्येक जण स्वतःच्या कोषात नकळत गुरफटत चाललो आहोत.छोट्याश्या वाद विवादामुळे नाती तुटत चालली आहेत.नात्या नात्यात न दिसणारी एक अभेद्य भिंत बनत चालली आहे.ही भिंत मग आपल्या नात्यात एक खोल दरी निर्माण करते.आपण जुन्या गोष्टी,जुने वैर छातीशी कवटाळून बसतो.मग नाती आणखीनच दुरावली जातात.
दुसरे असे की आजकाल सुट्ट्यांमध्ये पूर्वीच्या काळासारखे आजोळी जाणे,पाहुण्यांच्या घरी जाणे,मित्रांच्या घरी जाणे,कामाशिवाय भेटणे हळू हळू लुप्त होत चालले आहे.मोबाईल व्हॉट्स अप, व्हिडिओ कॉल याने दूर दूर चे अंतर क्षणात नाहीसे केले,जग जवळ आले पण दुर्दैवाने माणसं मात्र मनाने दूर होत गेली.
समोरासमोर संवाद,मन मोकळे करणं हे
आजकालची पिढी विसरत चालली आहे.एकाच रूम मध्ये वेगवेगळ्या दिशेला तोंड करून मोबाईल मध्ये नाक खुपसून आपण आपले डोळे खराब करत मानसिक संतुलन बिघडवत आहोत.
नीट विचार करा मी सगळ्या अवयवांची नावे गम्मतं म्हणून नाही घेतलीत....तर खरंच आहे असा एकही अवयव शिल्लक राहणार नाही जो मोबाईल टीव्ही च्या घातक सवयीने दुष्परिणामित होणार नाही.

मग असं काय करावे की आपली ही
नाती होत्याची नव्हती होण्यापूर्वी ती अजुन जवळ येतील,नव्या पालवी ने टवटवीतं होतील....
हो त्यासाठी पूल बांधावा लागेल...
मैत्रीचा,संवादाचा,प्रेमाचा,स्पर्शाचा आणि हो....सामंजस्याचा.
कारण शेवटी सर्व नाती टिकवण्यासाठी,नात्यांना घट्ट धरून ठेवण्यासाठी उपयोगी पडतो तो समजूतदारपणा,सामंजस्य.
कधी कधी नात्यातं आपला अहं बाजूला ठेवून दोन पावले मागे घेतलेली माघार आपलं नातं चार पावलानी अजुन पुढे नेवून ते आणखी बळकट करण्यासाठी उपयोगी पडते,नात्याला नवसंजीवनी देते.
काही दिवसांपूर्वी एक पुस्तक आले होते ज्यात मरणासन्न व्यक्तींनी सांगितलेले आयुष्याचे काही अनुभव कथित केले होते ज्यात त्यांनी म्हटले होते की
यश पैसा प्रसिद्धी याही पेक्षा महत्वाचं म्हणजे माणसं जोडणं,मैत्रीचे पूल बांधणं, जीवलगांच्या सानिध्यात राहणे.
याच गोष्टी माणसाला जगण्याची उर्मी,संकटात प्रेमाची गर्मी म्हणजे ऊब आणि वागण्यात नर्मी म्हणजे नम्रपणा देतात.


जे आतून जुळतं ते नातं

जो सामंजस्याने होतो तो संवाद

जे प्रेमाने खुलते ते जीवनं

जी मरेपर्यंत टिकते ती मैत्री

जी मृत्यूनंतरही येते ती आठवणं

जी कायम उपयोगी पडते तीच खरी शिकवणं.


हीच माणसं जोडण्याची,नातं टिकवण्याची शिकवणं आपल्याला माणूस म्हणून आणखी प्रगल्भ करते.
आता सावधं सावधान समय म्हणता लग्नातं आंतरपाट दूर होवून दोन जीवांचे मिलन होते तसेच सावधं होवून, आपल्या नात्यातल्या कटुतेचा अंत करून,त्यामध्ये असलेला गैरसमज दूर करून निर्माण झालेल्या अदृश्य भिंती पाडून नात्यांमध्ये प्रेमाचा पूल बांधणे गरजेचे आहे.नाती नव्याने जोडणे,नात्यांचे मनोमिलन होणे गरजेचे आहे.
मग पाडणार ना या गैरसमजुतीच्या अहंकाराच्या रागाच्या,वैराच्या भिंती आणि
बांधणार ना मैत्रीचा,प्रेमाचा,आपुलकीचा,सहवासाचा, संवादाचा,स्पर्शाचा,सामंजस्याचा पूल?

कारण भिंती या नेहमी विभागण्याचे काम करतात तर पूल हा नेहमी जोडण्याचे काम करतो.
खरं की नाही?

शुभस्य शीघ्रम....भिंती पाडा नी पूल बांधा.

भिंती पाडा पूल बांधा
कोमेजलेली नाती परत खुलवां
संवादाशी गट्टी करून
गैरसमजुती ला मुळापासून हलवां
नातं कुठलेही असुदेत
मैत्रीचे वा रक्ताचे तरीही
जपण्यासाठी ते मनोमनं
तुम्ही तुमचे प्रयत्न पुरवां.डॉ अमित.

27 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad