Bluepad | Bluepad
Bluepad
कल्पना....कल्पकता... नि संकल्प..
डॉ अमित.
डॉ अमित.
6th Aug, 2020

Share

कल्पना....कल्पकता... नि संकल्प..


आपण सर्व मनुष्य प्राण्यांची एक सुंदर अशी उपलब्धी म्हणजे "कल्पना" करणे.कल्पना... इमॅजिनेशन.... जसे एक प्रकारचे दिवास्वप्नं..प्रत्येक जण आपल्या मनात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची कल्पना करत असतो...त्या कल्पनेच्या दुनियेत तो पाहत असलेले एक प्रकारचे दिवा-स्वप्नं तो अक्षरशः जगून घेत असतो...याच कल्पनेच्या जोरावर तो काही क्षणं आकाशात आपल्या स्वप्नांसवे उंच भरारी घेत असतो.
पण तुम्हाला माहितीय का जर याच कल्पनांना कल्पकतेची जोड दिली तर काय काय साध्य होवू शकते ते?ही जी "कल्पकता" आहे ती कधी कधी उपजत असते तर कधी तिला प्रयत्नाने घडवावी लागते..कल्पकता कधी तुमच्या कामातून दिसून येते तर कधी तुमच्या वागण्यातून तर कधी तुमच्या बोलण्यातून..म्हणजे असे की काही जण आपल्या कामातून आपली छाप सोडून जातात तर काही जण आपल्या वागण्यातून तर काही जण आपल्या शैलीदार बोलण्यातून...तर काही जण आपल्या लिखाणातून....आणि हो काही जण तर अगदी फक्त आपल्या असण्यातून...
कुछ भी कर...दिलं से कर
फिर देखं....क्या करता है वो असर...


तुम्ही जे काही करत असाल...ते अगदी मनापासून करा..आपल्यात असलेल्या कल्पकतेने करा...मग पहा काय "कायकल्प" होतो ते....तुम्ही केलेली मग ती कुठलीही गोष्ट असुदेत कृती
असुदेत...ती समोरच्यावर... नक्की जादू करेल...त्यांना तुमच्या त्या कल्पकतेच्या प्रेमात पाडेल..
मला वाटतं प्रत्येकात कुठली ना कुठली कल्पकता दडलेली असते...गरज असते तिला मनापासून 'वाव' देण्याची..एकदा का तुम्ही तिला ओळखून वाव दिला तर मग बघा ती तुम्हाला किती "वाह-वाह" मिळवून देते ते.
हो पण कुठलीही चांगली गोष्ट करण्यापूर्वी आपल्या हिंदू परंपरेनुसार "संकल्प" केला जातो...संकल्प म्हणजे "दृढ- निश्चय"...आपल्या इष्ट देवतेला स्मरून जर आपण संकल्प केला तर ते काम विनासायास आणि निर्विघ्नपणे पार पडते...आणि हो जर का संकल्पा शिवाय ते काम केले तर त्याचे फळ इंद्र देवतेला मिळते..अशी मान्यता आहे.
चला तर मग आपणही आपल्या कल्पनेतल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी आपल्यात दडलेल्या कल्पकतेला थोडी हवा घालुयात...आणि आपले यशाचे इच्छित ध्येय गाठण्याचा संकल्प करूयात मग पहा साऱ्या दुनियेत तुमचीच हवा होते की नाही ते!


मी रोज आरश्यात बघतो... स्वतःला
कधी समोर रोजचाचं असतो मी की
कधी असतो एकदम अनोळखी..मीचं मला
जो असतो एका वेगळ्याच दुनियेतला
अगदी आपल्याच कल्पनेतं जसा रमलेला
विचारांच्या भाऊ गर्दीत कधी दमलेला
तर कधी शब्दांच्या अश्र्वावर आरूढ झालेला
जो आपल्या भावनांना मुठीत घेवून
कल्पकतेशी जमेल तशी गट्टी करून
संकल्पाची कास धरून या दुनियेत
आपला एक वेगळाच ठसा उमटवायला...


.....लढतो आहे...

....लिहितो आहे...

...व्यक्त होतो आहे...डॉ अमित.

18 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad