Bluepad | Bluepad
Bluepad
क्यों की डरं के आगे...... जीत है.
डॉ अमित.
डॉ अमित.
5th Aug, 2020

Share

क्यों की डरं के आगे...... जीत है.खूपं दिवसांपूर्वी दूरदर्शन वर एका
शित पेयाची जाहिरात येत होती कदाचित आताही येत असेल त्यामध्ये हीरो असे काही स्टंट्स म्हणजेच साहस दृश्ये करतो की आपण अचंबित होऊन जातो आणि शेवटी एक ओळ पडद्यावर उमटते,
क्यों की डर के आगे जीत है ....
ही साहस दृश्ये किंवा तत्सम अतिशयोक्ती सोडली तर ती ओळ मात्र बरचं काही सांगून जाते, सुचवून जाते
.. क्यों की डर के आगे जीत है..

खरचं आहे डरं..भीती...हे असे शब्दं आहेत जे आपले अवसानच गाळून टाकतात.
प्रत्येकाच्या मनात कसली न कसली तरी भीती दबा धरून बसलेली असते.बहुतांश वेळा एक तर ही भीती घडून गेलेल्या घटनां बद्दलची असते किंवा भविष्यात घडणाऱ्या अथवा घडू शकणार्या गोष्टीबद्दल वाटतं असते.
पण जेंव्हा आपण भूतकाळ अथवा भविष्यकाळं याचा विचार न करता वर्तमान काळाचा विचार करतो तेंव्हा ही भीती भीती न राहता एक कल्पनाच वाटतं राहते.त्यात तथ्य तर काहीच नसते.पण या भीतीपोटी आपण आपले वर्तमानच बिघडवून टाकतो.
मुलांना परीक्षेची भीती, परीक्षा झाल्यानंतर यश मिळेल की नाही ही भीती,एखादे काम सुरू करताना ते चांगले होईल की नाही ही भीती,स्पर्धेत भाग घेतल्यास यश मिळेल की नाही ही भीती.
भविष्याची फाजिल चिंता ही पण एक प्रकारची भीतीच.
एक ना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भीती प्रत्येकाच्या मनात ठाणं मांडून बसलेल्या असतात.
नीट विचार केल्यास असे लक्षात येत की ही भीती होऊ घातलेल्या परिणामांची असते.मग त्या परिणामांचा आपण का विचार करायचा?जी गोष्ट आपल्या हातातच नाही तिच्याविषयी का भीती मनात बाळगायची?

यश मिळण्यासाठीची त्रिसूत्री म्हणजे प्रयत्न-संधी-नशीब.
यातल्या आपल्या हातात असलेली एकमेव गोष्ट म्हणजे आपले प्रयत्न तेही प्रामाणिक...म्हणजे जे आपल्या हातात आहे ते आपण सर्वस्व म्हणजेच १०० टक्के देऊन, त्यात झोकून देवून प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते. यदाकदाचित हे प्रयत्न करताना अपयश जरी आले तरी हे अपयश आपल्याला बऱ्याच गोष्टी नकळत शिकवून जाते.म्हणून तर म्हटले आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.असे अपयश हे यशाचे दार नकळत किलकीले करते ज्यातून यशाचा सोनेरी प्रकाशरूपी मार्ग डोकावू लागतो.


भीती म्हणावी याला की
फक्त अनामिक हुरहूर
यशाच्या वाटेवर जी करते
मनात थोडी थोडी काहूर
नको शंका घेऊ तू स्वतःवर
करू नको प्रयत्नांत कसूर
जीत तुझीच होईल मित्रा
यशं तुलाच मिळेल जरूरतर मग मित्रांनो ही भीतीच जर आपण संपवून टाकली तर कुठल्याही क्षेत्रात आपल्याला यश दूर राहणार नाही.
मनाची सकारात्मकता,प्रयत्नांची पराकाष्ठा आणि मनातल्या भीतीवर मिळवलेला विजय हे आपल्याला यशापासून फार काळ दूर नाही ठेवू शकणार.
खरं की नाही?हो ना मग मिळवालं ना या मनातल्या भीतीवर तुम्ही विजय?

क्यों की डरं के आगे जीत है!


डॉ अमित.
18 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad