Bluepadविचारमंथन..भविष्याचा वेध
Bluepad

विचारमंथन..भविष्याचा वेध

ऋतुजा चव्हाण..
4th Aug, 2020

Share

काळ आणि वेळ आपल्याला खूप काही शिकवून जातात असाच काहीसा अनुभव या लॉकडाऊनचा काळात आला. जन्मापासून लगातार चालत आलेली धडपड ती मग नोकरीसाठी, उद्योगधंद्यासाठी, शेतीसाठी अथवा शिक्षणासाठी असो या सर्वाला जणू निसर्गानेच लगाम घातला नाहीतर आजच्या घडीला कोण हो इतका मोठा ब्रेक घेईल . आजच्या काळात तर असे वाटत होते की जो विश्रांती काळ (resting period) जो की निसर्गाने प्रत्येक ठिकाणी निश्चित केला होता तो आजच्या जागतिकीकरणाच्या संकल्पनेत पूर्णतः नष्ट च झाला होता. जागतिकीकरणाच्या माध्यमातून जगातील असंख्य लोक एकमेकाशी जोडली जात होती ती पण कामाच्या निमित्ताने पण जी रक्तमासाचीची नाते होती ती माञ तुटत होती याचा विचार करण्याचा अवधीही कोणाला मिळत नव्हता.आज जग काही अंशी ठप झाले आहे.काही क्षण ते भूतकाळात जरूर गेले आहे पण आज ही काळाची गरज बनली आहे.. आजच्या वर्तमानकाळात गतकाळातील भूतकाळ च भविष्यकाळाचा मार्ग खुला करणार आहे. या क्षणाला एकच क्षेत्रातील माहिती जगण्यास पूरक ठरणार नसून त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील किमान मूलभूत माहिती असणे आवश्यक ठरणार आहे.
या काळात सर्वच क्षेत्रात बदल घडत आहेत. विशेषतः शेक्षणीक क्षेत्र हे मात्र मनात एक वेगळीच शंका उत्पन्न करते. ज्यांच्या इतिहासाने इतिहासात जिवंतपणा आणला आज त्यांचाच इतिहास वगळण्यात येतोय याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण होईल का ? हा प्रश्न निर्माण होतो. आज समाज माध्यमामुळे तसेच शिक्षणामुळे इतिहास घराघरात पोहचत असतानाच तो वगळला जातोय यास मनावे तरी काय? शिवाजीमहाराजांचा इतिहास आजही सातासमुद्रापार अभ्यासाला जातो त्याचाच इतिहास वगळावा याला कसले धोरण समजावे. याने मात्र काही सध्या होणार नाही . जे अमर असते शतकांनी ही जे लोप पावत नाही ते अस क्षणात काल बाह्य होणार आहे याचा विचार मात्र जरूर व्हायला हवा.
महाराष्ट्रात १९ व्या व २० व्या शतकातील कालखंडाचा अभ्यास केला तर जी शिक्षण पद्धती होती ज्यामध्ये लोक प्राथमिक शिक्षण घेत तर होते परंतु त्यानंतर मात्र रितीनुसर आलेल्या पारंपरिक क्षेत्राकडेच वळत. आजच्या शिक्षण पद्धतीमुळे इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाही असा प्रश्न निर्माण होतो.लवकरात लवकर शिक्षण घेऊन छोटी मोठी नोकरी अथवा नोकरी असा बदल अस्तित्वात येऊ शकतो आणि जेवढं माणूस शिक्षणापासून दूर जातो तेवढी त्याची प्रगती खुंटते हे तर आपण अनुभवतो. नवीन विचार न केल्यामुळे तो जागतिकीकरणाच्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन पडेल हे मात्र त्याला पण कळणार नाही.दुसऱ्या बाजूने विचार केला तर माणसाची शिकण्याची प्रक्रिया अविरत सुरू असते परंतु ज्या दुरदृष्याप्रणालीचा (distance learning)वापर करणार आहेत त्यानेमुळे मुले हुशार होणार की केवळ महिती मिळणार हाही प्रश्नच.. शिक्षणही प्रकिया सोपी नहीमणून तर प्रत्येकाची समान प्रगती होत नाही.या माध्यमातून जी दरी निर्माण होणार आहे त्याची खोली मात्र प्रचंड असणार हे ही येणारा काळच ठरवेल..

23 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad