Bluepadतिचा सखा
Bluepad

तिचा सखा

Sangieta Devkar
Sangieta Devkar
29th Nov, 2021

Share

तिचा सखा..

अनपेक्षित पणे आयुष्यात आलेला तो,सखा जिवलग मित्र कोणते लेबल देऊ आमच्या नात्याला ? एका विशिष्ठ व्याखेत आमची मैत्री बसूच शकत नाही. कोणी कस इतकं साधं सरळ निर्मळ असू शकत? हा प्रश्न मला त्याला पाहुन कायमच पडतो. कोणाला ही न दुखवणारा ,प्रत्येकाच्या भावनांची कदर करणारा असा तो. न सांगता मनातलं ओळखणारा जणू मनकवडा! कायम चेहऱ्यावर गोड स्मित हास्य घेऊन वावरणारा. कसे जमते रे तुला अस राहायला? जग किती स्वार्थी मतलबी आहे आणि तू मात्र इतका निस्वार्थी ,प्रेमळ ? मैत्री ची खरी भाषा तू जाणतोस म्हणूनच जो तो तुझ्याशी मैत्री करायला तयार असतो. तू आहेसच तसा निर्लेप नितळ मनाने दिलदार.प्रत्येकाला नाही जमत रे असे म्हणूनच सगळ्या मित्रां मध्ये तू हवा हवासा आहेस. कधी कधी चिडतो रागवतो पण त्या मागे आपली काळजीच असते हे खूप उशिरा समजत. मैत्रीत हक्क अधिकार हे आपसूक येत जातात तिथे काही मागायचे नसते किंवा द्यायचे ही नसते. हा प्रेम आपलेपणा जिव्हाळा मात्र जपायचा असतो. ते तू करतोस कायम. आज काय केले किंवा काय नवीन लिहिलेस हे आवर्जून विचारणारा तू आणि मला कायम प्रोत्साहन देणारा तू ..कोण आहेस तू सखा मित्र की मार्ग दाखवणारा वाटाड्या का दीपस्तंभ प्रमाणे मला नेहमी मार्गदर्शन करणारा!! जगावं कसे हे तुझ्या कडून शिकावं. हसावे कसे हे तुझ्या कडे पाहून समजावं. तुला तुझ्या मैत्री साठी माझ्या भावना लिहायला माझ्या कडे शब्दच नाहीत रे. आणि शब्दात मावेल इतकी मर्यादित मैत्री नाहीच आहे तुझी! आज मैत्री दिनी काय शुभेच्छा देऊ तुला..तूच तर आम्हाला भरभरून देत आलास. तुझ्यावर कविता करायला कधी जमलेच नाही. शब्दात माज्या तू आता सामवणार नाहीस मैत्री तुझी मी कधी विसरणार नाही. तरी ही आज तुझ्या साठी तुझ्या मैत्री साठी हेच म्हणेन.
"सलामत रहे यार मेरा ,मेरी दुवा मे ये असर हो।

मैं सजदा करू यहा,वहा दर्द उसका कम हो।
तू और 'तेरी मुस्कान हमेशा बरकरार रहे,
आज यही दुवा मेरी कबूल हो।

संगीता देवकर.....प्रिंट &मीडिया रायटर..माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...*

*म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो...*

*आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!!*

*आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...*
*ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.*

*आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?*
*नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत...*
*कदाचित, पुन्हा भेटतील ,न भेटतील?*
*✍️व.पु.*

30 

Share


Sangieta Devkar
Written by
Sangieta Devkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad