Bluepad | Bluepad
Bluepad
माझ्या मात्र मनाली चैन काही पडेना......
S
Shraddha Ambre
2nd Aug, 2020

Share

बरोबर एकविस दिवस राहीले
बाप्पाच्या आगमनाचे दिवस जवळ आले
तरी सगळं काही सुरळीत होईना
माझ्या मात्र मनाला चैन काही पडेना....
काय हे सारं होऊन बसलं
तोडं झाकलेल्या लोकांत अंतर तेवढं वाढलं
करोना ग्रस्त लोंकाचें हाल काही पाहवेना
माझ्या मात्र मनाला चैन काही पडेना....
बाप्पासाठी कोकणात जाणा-यांची धडपड
चौदा दिवस क्वॉरनाटाईन करणार म्हणून होणारी तडफड
मंडपाची रोषणाई कुठेच दिसेना
माझ्या मात्र मनाला चैन काही पडेना....
काय म्हणत असेल बरं बाप्पा
त्यालाही प्रश्न असेल पडला
लोकांनी तुडुंब भरलेली मुंबई
आता रस्त्यावर कुठेच दिसेना गर्दी
माझ्या भक्तांशिवाय मला काही करमेना
माझ्या मात्र मनाला चैन काही पडेना....
लोकांनी एकत्र यावं गुण्यागोंविदान रहावं
म्हणून टिळकांनी चालू केला हा सण
करोना आला आणि सगळ्यांनाच पारखे झाले ते आनंदाचे क्षण
सरकांराचा नियम मला काही मोडवेना
माझ्या मात्र मनाला चैन काही पडेना....
ऐकतोस ना रे बाप्पा हया वर्षी घराघरातच बस
करोनाला पळवायला तूझा पूर्णपणे लाव कस
तो असे पर्यंत तूझा सण मनासारखा काही साजरा होईना
माझ्या मात्र मनाला चैन काही पडेना...
अकरा दिवस इथे आनंदाने रहा
आमच्या दुःखी मनाला तुझाचना रे आसरा
तुझ्या येण्याने माझा आंनद गगनात मावेना
माझ्या मात्र मनाला चैन काही पडेना..
जे असेल जसं मिळेल त्यातूनच करू तुझ्या मखराची आरस
हया वर्षी घराघरातूनच तूझी सेवा करू सरस
प्रत्येक चाकरमान्यांची पूजा इथूनच गोड मानून घे आनंदाने
काय करू ह्या लॉकडॉऊनमुळे तुझ्या पर्यंत पोहचवेना
माझ्या मात्र मनाला चैन काही पडेना.....

14 

Share


S
Written by
Shraddha Ambre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad