Bluepadशांतता.......निसर्गातून मनात झिरपणारी.
Bluepad

शांतता.......निसर्गातून मनात झिरपणारी.

डॉ अमित.
डॉ अमित.
31st Jul, 2020

Share

शांतता.......निसर्गातून मनात झिरपणारी.


आज सहज संध्याकाळी सायकल वर स्वामींच्या दर्शनासाठी गेलो होतो.सूर्य मावळतीला हळू हळू येत होता.स्वामींचे दर्शन घेऊन तिथेच थोडा वेळ बसून राहिलो.नुकतीच स्वामींची आरती झाली होती.सहज डोळे मिटले.लक्ष श्वासांवर केंद्रित केले.एक नीरव शांतता माझ्या मनात नकळत घर करत आहे असे जाणवले.वाटले ही शांतता नक्कीच वेगळी आहे,हळवी आहे.
खूपदा आपण मनातून अशांत असतो,अस्थिर असतो.
मन थाऱ्यावर नाही असे आपण अनेकदा म्हणतो.
पण का कोणास ठाऊक कधी कधी हे अगदी विनाकारण होत असते किंवा आपल्याला त्याचे कारणच उलगडत नसते.

नाही उमगत कधी कधी
खोल मनाच्या तळाशी दडलेली
ही शांतता असते का ठिणगी
जी असते वणव्या पूर्वी पेटलेली.


हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपलाच आपल्याशी संवाद हवा,निसर्गाशी संवाद हवा.
बऱ्याच वेळा जेंव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात
जातो तेंव्हा नकळत आपण आपल्याशी संवाद साधू लागतो.आपण आपल्यालाच नव्याने पुन्हा ओळखू लागतो.हीच तर जादू आहे निसर्गाची.

स्वामी समर्थ हे दत्तांचे पूर्णावतार.दत्तांनी निसर्गातील गोष्टींना आपले गुरु मानले.त्यांचे चोवीस गुरु आहेत.
पृथ्वी,अग्नी,वायू,जल,आकाश,चंद्र सूर्य,समुद्र,भ्रमर, हत्ती,अजगर असे चोवीस गुरु आहेत.प्रत्येक गुरु कडून त्यांनी त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या.म्हणून तर त्यांना अवधूत असेही म्हणतात.
किती समर्पक असे नाव आहे.
आपणही जेंव्हा जेंव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो तेंव्हा तेंव्हा निसर्गाचे ते गुण आपल्यावर त्यांचा प्रभाव टाकतात.म्हणूनच की काय आपला आपल्याशीच संवाद सुरू होतो.


शांततेत या मी जेंव्हा
बोललो माझ्या स्वतःशी
ओळखू लागलो मी मलाच
पुन्हा नव्याने जोडलो जीवनाशी
म्हणून तर मला वाटते प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवावा.एक दिवस नाही जमले तर किमान काही वेळ तरी अवश्य घालवावा.
हा गेलेला वेळ नक्कीच फुकट नाही जाणार.
तो तुम्हाला नवसंजीवनी देईल.मनाला आलेली मरगळ दूर करेल.मनाला एक नवी उभारी देईल.
मग तुम्ही पण या प्रफुल्लित मनाने स्वप्नांच्या आकाशात भरारी घेत जीवनाला आनंदाने सामोरे जाताल.

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुये मे उडाता चला गया.


येथे धुवा आपल्याला सिगारेटचा न काढता आपल्या अडचणींना वाऱ्यावर भिरकावून लावण्याचा मी सल्ला देईल...ना की सिगारेट प्यायचा.
थोडीशी गंमत केली बरका शेवटी.

अशी ही मनाची शांतता मग तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात गवसेल जी तुम्हाला स्वप्नांना गवसणी घालायला नक्कीच मदत करेल.


डॉ अमित.


20 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad