Bluepad | Bluepad
Bluepad
माझी कोरोनाशी गाठ

N
Nilima Khadatkar
30th Jul, 2020

Share

जगात कोरोनाचा वाढत होता कहर,
माझे मन मात्र म्हणे
मी तर घरातच, मग मला कसलं डर,
पण एके दिवशी मात्र घात झाला
आणि नकळत त्याने माझ्या घरात शिरकाव केला,
ताप खोकला ,घसा दुखणे सारी कोरोनाची लक्षणे
तरीमनात एक आशा, असेल साधे हे दुखणे,
मात्र एका रीपोटने सारे स्पष्ट केले
व अंगातले बळ सारे निघून गेले,
नैराश्य, नकारात्मक विचार मनांत सदा येई
आणि शारिरीक त्रासापेक्षा मानसिक क्लेश जास्त होई,
दैव माझे चांगले की पाठीशी माझ्या सारे,
नातेवाईक,सहकारी आणि प्रियजण, प्रार्थनेमुळे त्यांच्याच मीझाले बरे,
मागणे आता एकच देवा तुझ्याकडे ,
माझ्या सारखी गाठ न कुणाची ही कोरोनाशी पडे
माझ्या सारखी गाठ न कुणाची ही कोरोनाशी पडे।

15 

Share


N
Written by
Nilima Khadatkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad