Bluepadहँडसम......दिसणे जरूरी की असणे?
Bluepad

हँडसम......दिसणे जरूरी की असणे?

डॉ अमित.
डॉ अमित.
28th Jul, 2020

Share

हँडसम......दिसणे जरूरी की असणे?


प्रत्येकाला आपण हँडसम दिसावे...चार चौघात आपले व्यक्तिमत्व उठून दिसावे..असे नक्कीच वाटत असते...साहजिकच आहे म्हणा पण रूपाने हँडसम दिसणे हा भाग जितका हवा हवासा तितकाच किंबहुना त्याहून अधिक महत्वाचं आहे हँडसम असणे...तुम्ही म्हणाल काय फरक आहे या दोन्हीत?
नक्कीच आहे... थोडं 'हँडसम'या शब्दाची जर वेगळ्या प्रकारे उकल केली की तुम्हाला समजेल.
जशी "गिव्हिंग यूअर हँड टू समवन व्हू इज इन रिअल नीड"......किती खरं आहे नाही?
एखादा त्रासलेला,गरजू,संकटात असलेला कोणी तुमच्या समोर आहे आणि त्याला दुर्लक्षित करून तुम्ही तसेच तुमचे रूटीनं सुरू ठेवता....
ही गोष्टचं मनाला क्लेश करणारी आहे...नाही का?
त्या समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी काही क्षणं तुम्ही स्वतःला अनुभवा...फक्त काही
क्षणचं...मग पहा तुम्हाला तुमचं मन काय कौलं देतं ते...हा तुमच्या मनाने दिलेला कौलचं..तुम्हाला तुमच्या जाणिवां बद्दल, कर्तव्या बद्दल अधिक संवेदनशील करेल.
काय हरकत आहे फुल ना फुलाची पाकळी या हिशोबाने तुम्हाला त्या क्षणी जमेल तशी त्याला मदत करण्यात?त्याच्या साठी मदतीचा हात पुढे करण्यात?
मदत फक्त पैश्याच्या रूपातच असावी असे थोडीच आहे?तुम्ही त्यावेळी त्याच्याशी बोललेले दोन प्रेमाचे शब्द देखील कधी कधी खूप मोलाची मदत करून जातात...तुम्ही त्यावेळी त्याला फक्त दिलेला दिलासा... की
मैं हुं ना!....हा देखील लाख मोलाचं काम करू शकतो...
मला वाटतं स्वामी शक्तीही अशीचं तुम्हाला धीर देत असते...भिऊ नकोसं मी तुझ्या पाठीशी आहे....किती धीर येतो फक्त या शब्दांनीच..
माझ्या साठी हे फक्त एक वचन नाही तर एक भक्कम असा आधार आहे. पाठबळ आहे.🙏

असा हा हँडसम पणा थोडा वेगळा जरी असला तरी तुम्हाला नक्कीच एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवेल... ही उंची ना पैशांची असेल...ना भल्या मोठ्या टुमदार उंचच्या उंच घराची असेल ना यशाच्या उंचच उंच शिखराची असेल...
तर ही असेल तुम्हाला मिळालेल्या समाधानाची... मनःशांती ची.. जी तुम्ही त्या गरजवंताला वेळीचं मदत केल्यामुळे अनुभवलेली असेल..


मैं चला था...बहोत देर दूर तक अकेले
अपने ही गमों का बोझ लेके सिर पर
राह में कई मिले...हमसफरं मेरे जैसे
उनका हात जो थामा..जिंदगी मेरी संवर गयी


खरंच होतं बरकां असं...एखाद्याला आपण मदतीचा हात देतो पण त्याचा फायदा त्याच्या सोबत आपल्यालाही झालेला असतो किंवा होणार असतो..तो कधी कधी लगेच लक्षात येत नाही..पण आयुष्यात तशी वेळ कधी आपल्यावरही आलीच तर तसा मदतीचा हात आपण होवून आपल्या समोर आलेला असतो अगदी ध्यानी-मनी नसताना.
आज प्रत्येकाने जर असं हँडसम व्ह्यायचं ठरवलं ना तर ही दुनिया...स्वर्गाहून कमी सुंदर नक्कीचं राहणार नाही....मग तो या विश्वाचा निर्माता ही विचार करेल की ...

आईना देख रहा हुं मैं या फिर
देख रहा हुं अपनीही कारागिरी को
इंसान आज फिरसे इंसान बना हैं
आज तक जानवर समजता था जिस को...

तुम्हाला आवडेल का असे हँडसम होणे?
मला वाटतं नक्कीचं आवडेल ...
चला तर मग आपण आपला हात पुढे करू एखाद्या गरजवंतासाठी...आणि हँडसम
होण्यासाठी एक पाऊल पुढे उचलू...असे हँडसम जर तुम्ही असाल तर.... खरोखरंच तुम्ही
आताहूनही अधिक हँडसम नक्की दिसाल....हा माझा शब्द आहे तुम्हाला...आणि हो तुम्हाला माहिती आहे की लेखकासाठी शब्दांहून सर्वात मोठं अधिक काय असू शकतं?


डॉ अमित.


21 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad