Bluepad | Bluepad
Bluepad
नको ना बरसू........
S
Shraddha Ambre
27th Jul, 2020

Share

नको तो पाऊस मनाला वेड लावणारा
अवखळ आणि मनसोक्त बरसतच राहणारा
नुसताच येत नाही तो तुझ्या आठवणी आणतो
विझलेला तो अग्नि उगाच त्याला वारा घालू पाहतो
मनाच्या खोल दरीत गाडल्या त्या आठवणी
उगाच त्यावर मग अंकुर येऊ पाहतो
तुझ्या माझ्या भेटीचा तो एकमेव साक्षी होता
घाव वरणी लागला तेव्हां ही तोच पाहत होता
त्याच्या येण्याने ह्या आठवणी नव्याने उजळतील
त्याचा प्रकाश मात्र मला जिवंतपणी जाळतील
नकोच तो नकोच त्याच येणं........
त्याच्या धारांमध्ये भिजून तिळ तिळ मरणं
मी अशीच बरी तुझ्या आठवणीत रमलेली
तू नसतानाही माझी मात्र कळी खुललेली
प्रत्येक दवात तूझ असणं भरून राहीलयं
कोसळणा-या धारात तुझ अस्तित्व वाहतयं
म्हणून त्या पावसाला माझ एकच सांगण आहे
तुझ्या बरसण्याने माझ्या मनाच्या भेगा रूंदावणार आहे
भरत आलेल्या मनाची खपली उघडणार आहे
म्हणून सागंते ऐक माझ म्हणणं
नकोच ते नकोच तुझं येणं.............

-श्रध्दा आब्रें

नको ना बरसू........

2 

Share


S
Written by
Shraddha Ambre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad