Bluepadश्री स्वामी समर्थ
Bluepad


II श्री स्वामी समर्थ II

S
Shraddha Ambre
27th Jul, 2020

Shareजगतजननी ह्या विश्वाची
तुला नतमस्तक ही दुनिया सारी
काय तूझी मी गाऊ थोरवी
क्षुद्र जीवी ह्या जगती मी
अगम्य लीला दावीसी तू
तुझा न लागे ठाव कुणाला
जरी गूढ असले रुप तुझे
तरी आसरा तुझाच मनाला
हा उभा जन्मही अपुरा पडे
तुझ्या चरणी जीव वाहीला
तुझेच नाम असूदे मुखात
तुझा न विसर पडो आम्हांला
आईरुपी तुझी छबी
अशीच खोलवर वसली मनी
भक्तांच्या आर्त हाकेला
धावून येते स्वामी माऊली
तूला न दुसरा मोह कुठला
सदैव भक्तांच्या प्रेमाचा भुकेला
म्हणून नेहमी जपा 'श्री स्वामी समर्थ'
नाही तर जन्म जाई व्यर्थ
सौ. श्रध्दा शैलेश आंब्रे
2 

Share


S
Written by
Shraddha Ambre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad