Bluepad | Bluepad
Bluepad
माझ्या मना
archana pralhad jadhav
archana pralhad jadhav
26th Jul, 2020

Share

माझ्या मना

माझ्या मना आता तरी थांब ना,
माझ बोलण एकदा ऐक ना...

मी आहे थोडी तत्ववादी,
पण तु थोडस सावरून घे...

मी कधी वाटेत चालताना खचले,
तर तु मला माझ कतृत्व दाखवून दे...

माझ्या चुकलेल्या गोष्टींना,
तु थोड आवरून घे...

माझ भावनांच आभाळ दाटून आल,
तर तु मला मी चालेल तस चालू दे...

माझ्या गोड आठवणींच्या जगात,
तु जरा क्षणभर रमून घे...

माझ्या घड्याळाच्या वेळेप्रमाणे,
मला जोरात पळू दे...

मी आयुष्याच्या वाटेत आनंदी असताना,
तु ही मनमोकळ मनसोक्त हसून घे...

सावरून घेशील ना नेहमी मला,
रोज तुलाच गोष्टी सांगायच्यात मला...!!!


2 

Share


archana pralhad jadhav
Written by
archana pralhad jadhav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad