Bluepad | Bluepad
Bluepad
मी कशाला आरशात पाहू ग
Sangieta Devkar
Sangieta Devkar
25th Jul, 2020

Share

अलीकडेच सोशल मीडिया वर मुलींचे विदाउट मेकअप चे फोटो फॉरवर्ड होऊन फिरत होते. त्यावर विनोद केले जात होते. महिलांच्या भुवयाचे केस,डोक्या वरील केस वाढलेले तसेच पुरुषा सारखी दाढी मिशी वाढलेले फ़ोटो टाकून पार्लर बन्द असल्याचा परिनाम या हेडिंग खाली या पोस्ट फिरत होत्या. याचा अर्थ काय तर स्त्री सुंदर असेल तरच ती समाजात स्वीकारली जाते अन्यथा ती चेष्टाचा विषय बनते. मुळात निसर्गानेच स्त्रीला सुंदर बनवले आहे मग तिला सौन्दर्याच्या मापदंडात बसवनारे हे लोक कोण? सध्या लॉकडावून मुळे सगळे काही बदलले राहणीमान ,आपल्या गरजा सगळ काही बदलल. मुलींना आणि महिलांना हे ही समाजले की पार्लर मध्ये न जाता ही आपण सूंदर दिसू शकतो. वारेमाप खर्च करून आपण सुंदर दिसनयाची धडपड़ करत राहतो. पण का आणि कोणा साठी हा प्रश्न एकदा सव्हताला विचारुन पाहायला हवा. शेतात राबनारी ,उन्हात कष्ट करणारी रापलेलया हाताची बाई सुंदर असत नाही का? पुरुष मानसिकता ही कधी ही न बदलनारी आहे त्यांच्या नज़रेत आपण सुंदर दिसाव असा अट्टाहास का? सूंदर दिसने म्हणजे बाहय रूप सुंदर असने असा असेल तर मग स्त्री मनाने सुंदर नसते का? निसर्गाने स्त्रीला नवा अंकुर जन्माला घालन्याची ताकद बहाल केली आहे ,ते ही तिचे सौंदर्यच आहे की! स्त्रीने सव्हता स्वावलंबी असणे,स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनन्याचा प्रयत्न करने हे जास्त महत्वाचे आहे ना की पुरुषा साठी लोकांसाठी त्यांच्या नज़रेत सुन्दर दिसन्या साठी ! मुळात स्त्री ने कोणा साठी सुंदर रहावे दिसावे हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. ती सुंदर आहे की नाही हे ठरवन्याचा अधीकार ही तीलाच आहे. प्रत्येक स्त्री सुंदर असते. कोणाचे डोळे सूंदर कोणाचे केस,कोणाचे बोलने,तर कोणाचा स्वभाव सूंदर तरी ही पुरुषी नजरेने ठरवलेली फुटफटी 36 - 24- 36 यात बसन्यासाठी बाई का धड़पडत असते? कोणी ठरवले हे मापदंड ? आजच्या जगात टिकायचे असेल तर सुंदर दिसलेच पाहिजे ही अवास्तव अपेक्षा नाही का? टी व्ही वर जाहिराती मध्ये छान छान स्वयंपाक पटकन आवरून घेणारी स्त्री तिच्या चेहऱ्यावर घामाचा लवलेश नाही हे वास्तवात शक्य आहे का? आपण जसे आहोत तसे दिसने म्हणजे खरे सौंदर्य होय.आपण कोणाला आवडत असु तर ती व्यक्ति आपल्याला आपल्या गुणदोषा सहित स्विकारते. आज ग्रामीण असो किंवा शहरी प्रत्येक स्त्री ने सव्हताला सिद्ध करून दाखवले आहे. प्रत्येक क्षेत्रात ती दैदीप्यमान यश मिळवत आहे यात ती कशी दिसते याला काहीच महत्व नाही. . यासाठी स्त्रीने सव्हता या सौन्दर्याच्या कचाटयातून बाहेर पडले पाहिजे. आपण आहोत तसे छान आहोत हे तिने आधी स्विकारले पाहिजे. मगच ती इतरांच्या अपेक्षाची बळी पडणार नाही. तिने सव्हता हे मान्य केले पाहिजे की "मी कशाला आरशात पाहू ग,मिच माझ्या रूपाची राणी ग....!!!!

17 

Share


Sangieta Devkar
Written by
Sangieta Devkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad