Bluepad | Bluepad
Bluepad
बाप रे...........बाप!👨‍👦👨‍👦👨‍👦🌹
डॉ अमित.
डॉ अमित.
25th Jul, 2020

Share

माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गुंफलेली शब्द सुमने....बाप रे...........बाप!👨‍👦👨‍👦👨‍👦🌹


बाप रे....बाप!
अरेच्चा नक्की दडलंय काय या शीर्षकात.....?
सांगतो सांगतो,अगदी सविस्तर.

वेळ कसा निघून जातो काही कळतच नाही ना?
बघता बघता दहा वर्षे पूर्ण झाली...
आजपासून बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २३ एप्रिल २०१०. मला डॉक्टर या उपाधी पेक्षा खूप खूप मोठी अशी उपाधी मिळवून देणारा हा अनमोल क्षण.
ती उपाधी म्हणजे "बाप"ही....हो मी बाप झालो त्या दिवशी.एक छान सुंदर गोंडस अश्या मुलाचा....
त्या दिवशी मी जणू आनंदाच्या हिमशिखरावर आरूढ झालो होतो.जणू मी माझेच प्रतिबिंब आरश्यात पाहत होतो.आम्ही लाडाने(...हो हो आमच्या लाड कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र मिळून छानसं बारसं करून हे नाव ठेवले म्हणून ही लाडाने म्हटले) त्याचे नाव 'शर्विल 'असे ठेवले.
भगवान श्री कृष्ण आणि श्री गणेश यांच्या अनेक नावातील एक असे हे नाव.
जेंव्हा ईश्वर एखाद्याला बाप करतो ना तेंव्हा तो बाप हा शब्दं खरंच अगदी सार्थ बनवण्याची जणू संधीच त्याला देत असतो.
मला स्वतःला वाटते बा....लपण प..रत मिळवून देणारा अनुभव म्हणजेच बाप होणे होय...
अक्षरशः त्याच्या बाललीला पाहताना मी माझे
बालपणं पुन्हां पुन्हां अनुभवतं होतो.


तू माझा अंश असणे....
हा माझा मी सन्मान समजतो
तुझ्यातल्या मला मी
माझा नव्याने पुनर्जन्मं समजतो ....


मी माझ्या पप्पांच्या बाबतीतही खूप हळवा आहे.
त्यांनी माझ्यासाठी आतापर्यंत जे काही केले ते तर अतुलनीय आहेच.पण जेंव्हा मी स्वतः एका मुलाचा बाप झालो तेंव्हा पासून तर ते मला अधिकच प्रिय झाले आहेत.तसे तर सर्वच नात्यांच्या बाबतीत मी हळवा आहेच.नाती जपणे,त्यांना खुलवणे मला आधीपासूनच खूप आवडते.
मग ती नाती रक्ताची असुदेत वा माणुसकीची.

आणखी एक गंम्मत म्हणा किंवा योगायोग म्हणा हवे तर...पण २३ या अंकाचे आणि माझे एक अनोखें असे दृढ नाते आहे.माझी स्वतःची जन्म तारीख २३ जुलै,माझ्या मुलाची म्हणजे शर्विल ची जन्म तारीख २३ एप्रिल,माझ्या लग्नाची तारीख २३ जुन,मी माझं एमबीबीएस वयाच्या २३ व्या वर्षी पूर्ण केले.माझी पहिली चार चाकी गाडी मी २३ जानेवारी या दिवशी घेतली. यातले काहीही मुद्दामून ठरवून केलेले नव्हते बरकां.(हे विशेषच म्हणावे लागेल😀😀)
बघता बघता दहा वर्षांचा काळ गेला..अंगा
खांद्यावर बसून खेळणारा शर्विल माझ्या खांद्यापेक्षाही उंच झाला...त्याने त्याच्या आयुष्यातही यशाची उंचच उंच,उत्तुंग अशी शिखरे पादाक्रांत करावीत...हा माझा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला मनापासून शुभाशीर्वाद...आयुष्यात हे उत्तुंग यश मिळवताना मात्र त्याचे पाय कायम जमिनीवर राहावेत,माणसातील माणुसकी त्याने कायम जपावी...
नात्यांची ओल मनात झिरपू देवून प्रेमाचा पाझ़र सतत वाटत रहावा हीचं ईश्वर चरणी प्रार्थना.

भलेही छूं लेना कामियाबी की बुलंदियो को तुम
अपने पाव हमेशा जमीन पर रखना....
माता हैं ये धरती तुम्हारी इसके प्यार को
अपने सिने मे तुम हमेशा सजाये रखना....


आजच्या तुझ्या या वाढदिवसाच्या दिवशी तुला काय काय आणि किती शुभाशीर्वाद देवू असे मला झाले आहे.
लॉक डाऊन असल्यामुळे आणि संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाने ग्रासल्यामुळे अगदी साधेपणाने तुझा वाढदिवसं आपण साजरा करणार आहोत.मला वाटतं तू ही तेवढा समंजस नक्कीच आहे.लहान मुलांसाठी आपला स्वतःचा वाढदिवस म्हणजे एक आगळे वेगळे अपृपचं असते आणि तू तर वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पुढच्या वाढदिवसाच्या क्षणाची, त्या तारखेची आतुरतेने वाट पाहत असतो.(हे मला नक्कीचं माहीत आहे बरोबर आहे की नाही मी मनु?...हो मनु हे आमच्या शर्विल चे लाडाचे नाव बरकां!)


Be...

S. H. A. R. V. I. L.

S...trong.. म्हणजे खंबीर हो.
H..ealthy...म्हणजे आरोग्यपूर्ण तंदुरुस्त रहा.
A..mbitious..म्हणजे महत्वाकांक्षी हो..
R...esponsible म्हणजे जबाबदार हो..
V...ictorious...म्हणजे विजयी हो..
I...conic म्हणजे मूर्तिमंत हो
L...ovable..म्हणजे प्रेमळ रहा सर्वांशी..
ALWAYS.

तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छां...

Happy birthday dear SHARVIL......🎂🎂🍰🍰🍫🍫🍫🍦🍦बाप बाप असतो...
लेकराच्या सुखासाठी
जो सतत धडपडतं असतो...


बाप बाप असतो..
पोटात जरी नाही वाढविले
क्षणोक्षणीं लेकराला मनात जपतं असतो...


बाप बाप असतो...
आपल्याला न मिळालेले सुखंही
लेकराला देण्यासाठी झटतं असतो...


बाप बाप असतो....
त्याच्या न दिसणाऱ्या अश्रूंची
किंमत तो नकळत मोजतं असतो...


बाप बाप असतो....
घरासाठी अविरतं झटणारा
ईश्वराच्या रूपातील पाठीराखा असतो.


स्वामीं सारखाचं सदैव तुझ्या पाठीशी असणारा,

तुझा बाप...उर्फ पप्पा..उर्फ पा.( नाम तो जरूर सूना होगा.....जो तुम्हारे नाम के साथ हमेशा जुडा रहेगा....थोडासा फिल्मी हो जाये. )

शेवटी इतकंच सांगतो .....

बाप बाप होता है
बच्चों के लिये सारा जहाँ होता है
मां गर जमीन हैं तो
बाप आसमान होता है....

बाप रे बाप....भलताच मोठा झाला की हा लेखं...असो..घ्या सांभाळून या गरीब बापाला,😀😀🤦🤦🤦.डॉ अमित.


31 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad