Bluepadशेवटी काय उरलं
Bluepad

शेवटी काय उरलं

मर्मस्पर्शी जीवन
मर्मस्पर्शी जीवन
24th Jul, 2020

Share

रहिमन कबहु रहेन के नाही गर्व कर लेस ।
आद् धरे संसार को तऊ कहवत सेस ।

रहिम यांनी लिहीलेल एक सुंदर दोहा हा आज या लेखाला सर्मपक राहिलं. या दोह्याचा अर्थ फार सुरेख आहे. " मोठी कामे केली म्हणून गर्व करु नका. इतकी मोठी सृष्टी मस्तकावर धारण करणारा शेष पण त्याने आपले नावच शेष ( उरलेला ) असे नम्रतेने सांगितलेच ना. काय योगायोग आहे ज्या शाळेत मी शिकलो जिथे माझ्यावर अनेक संस्कार झाले. अशी माझी शाळा पुण्यातील एक नामवंत शाळेपैकी एक नु.म.वि.प्रशाला आणि आमच्या शाळेच चिन्हच शेष नागाने पृथ्वी मस्तकावर धारण केली आहे असं ते चिन्ह आहे. आजचा लेख काही माझी शाळा या विषयावर नाही आहे. आणि तुम्हांला माझी शाळा हा निबंध आठवला असेल कदाचित. पण आजचा हा लेख हा अशा दोन पात्राचा आहे जे एक खेळाच्या निपुण असे आहेत. व एकमेकांशी असलेली प्रतिस्पर्धा जिंकण्याची जिद्द आणि या मुळे शेवटी काय उरलं हेच दिसून येईल.
हे जे दोन पात्र तुम्हाला आज या लेखात दिसत आहेत ते कदाचित आपल्या सोबत असणारे मित्र मैत्रिणी घरचे नातलग यातील एक वाटल्यास आश्चर्यचकित होऊन जाण्याच काम नाही. हे ज्या खेळात निपुण असे आहेत तो खेळच फार संयमाचा आणि बुद्धीला चालना देणारा आहे कितेकांनाहा खेळ खेळता येत असेल तो म्हणजे बुद्धीबळ हिंदी मध्ये शतरंज डावपेचा करुन विजय कसा मिळवावा हा या खेळाचा मुख्य हेतू असावा. आणि हे दोन्ही बुद्धीबळ खेणारे एकमेकांचे प्रतिस्पर्धा यांना एकमेकांना तगडी झुंज देण्याच्या तयारीत आहेत. यांची ख्याती होती की हे दोघे सहजा सहजी हार मानत नाही. सामना अनिर्णित राहिला तरी चालेल एक वेळेस पण पराभव मान्य नसे. बहुदा त्या दोघांनच्या स्वभावाचा स्थायी भाव असावा कडवी झुंज देणे, शेवटची चाल चाले पर्यंत पराभावाची मगर मिठी टाळण्याचा प्रयत्न करणारे. हे जरी विख्यात होते पण त्यांनचा सामना आजवर कधी झाला नव्हता, आणि प्रत्येकाला उत्सुकताही होती की कोण नक्की जिंकणार?? विजय कोणाला मिळणार?? अशा अनेक प्रश्नांची वलय आजूबाजूला आता फिरु लागली होती. कितेकांनच्या चर्चा या वरच रंगत होत्या. आता तर खरी सुरुवात झाली होती. या डावाचा सिकंदर कोण ????
ठरलेल्या वेळी खेळ चालू होतो. बघण्या-याची अलोट गर्दी होते, यांनचे चाहते तर विशेष वेळ काढून आलेले असतात. खेळ चालू होतो दोघेही काही ना काही विचार करुन आले असतील अभ्यास केला असेल एकमेंकाच्या खेळाचा डावांचा. एक दीर्घ शांतता पसरते आणि त्या वातावरणात खेळ सुरु होतो. दोघे ही तयार होतात आपल्या सैन्या बरोबर पांढरे मोहरे (प्यादी) काळा प्यादांना ( मोह-यांना) युद्धभूमीत कशा प्रकारे मात करणार याची तयारी करुन आलेले दिसत होते. अनेकांना वाटत असते की या खेळात हत्ती , घोडा , उंट, प्यादी, म्हणजे नक्की काय ?? खर तर या विविध प्रकारचे मनुष्य स्वभाव प्रकट करतात. या खेळातून नेहमी काही ना काही बोध मिळतोच व्यवहारिक ज्ञान भेटतेच. एक एक प्यादा आपली जागा सोडून पुढे चालू लागतो, डावपेचांना सुरुवात होते अनेक प्यादी, घोडे खेळातून बाद होतात. खेळायला रंग चढतो, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला जाते!! पराभवी कोण आणि विजयी कोण? आपले आपले अनुमान लावत सर्व प्रेक्षकवर्ग प्रत्येक चाल बारकाईने पाहत असतात. अचानक बुद्धीबळ पटावर हालचालीचा वेग वाढतो, तशीच प्रत्येकाची मनी जयपराजयाची गणितं बदलू लागतात. पटाची काळी बाजू अनपेक्षित रित्या मजबूत बनते व पांढरी बाजू जी जिंकण्याच्या जवळ आलेली असताना ही मागे खेचली जाते. प्रत्येक प्रेक्षक अचंभित होतो जिथे पांढरी बाजू जिंकणे अपेक्षित होतं. तिकडे त्याबाजूलाच शह-काटशह मिळतो व पांढरी बाजू हरते. पण अस काय झालं की हातात आलेले यश अपयशात रुपांतरीत झाले. जो दुसरा जिंकतो तो ही फार खुश नसतो वरच्या तोंडाने तो प्रत्येकाकडून अभिवादन स्वीकारत असतो. त्यालाही हाच प्रश्न पडतो की मी हरणार होतोच माझा अर्धा पट मोकळा झाला होता. तरी त्यांने मला का जिंकू दिले. जरी तो जिंकला होता पण मनात तो हरलेली भावना जगत होता. विजय मिळाला म्हणून प्रशंसा फार करण्यात येत होती त्यांची पण त्याला हे जाणून घ्यायचे होते की हे असं का घडले??
तो त्याच्या प्रतिस्पर्धी ला भेटतो व विचारतो तु मला का जिंकू दिले. त्यावर तो लवकर काही उत्तर देत नाही. तो शांत पणे उभा असतो हा त्याला सतत विचारतो की तु का हरलास मी जिंकलो आहे तरी मला तु हरवले आहे हीच भावना आहे. त्यावर तो दुसरा हसून उत्तर देतो, आणि तो सांगू लागतो काही वर्षापुर्वी मी पण असा नवालैकिकाला आलो होतो त्यावेळीस माझा असाच सामना एका अत्यंत चतुर खेळाडूशी झाला. तो ही माझ्याकडून हार पत्करतो, मी ही त्याला असाच तुझ्या सारखा तावा तावाने विचारायला गेलो की तु का हरलास आणि मला का विजय मिळू दिला. त्यावर त्या चतुर खेळाडून उत्तर दिलं की हा तुझा विजय तुला हे सतत आठवण करुन देत जाईल की तुला दिग्विजय प्राप्त करायचा असेल तर एक काटा जीवन भर टोचणारा असाव आणि तो तुला सतत हे दाखवून देईल विजय सहज मिळाला पण तो टिकवता यावा म्हणून किती नम्र व्हावं लागेल. तरच तो टिकेल ही शिकवण त्यांने मला दिली आणि आज तुला मी देत आहे. आता तुला हा काटा आयुष्यभर दुखती नस राहिलं आणि सतत काही तरी करायला लावेल.
आज या लेखातून हेच सांगाच आहे अशी काटेरी शिकवण देवून जाणारे सगळी कडे असतात पण तो काटा समोरच्या व्यक्ति जीवनात शेवटी काय उरवतो हे महत्वाचे आहे एक शल्य कि एक नम्रभाव...
©️

लेखक :- शुभम ज्योती चव्हाण ●
● संपर्क :- ९४०५८३१४३७ ●
● विशेष आभार :- करण डहाळे

26 

Share


मर्मस्पर्शी जीवन
Written by
मर्मस्पर्शी जीवन

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad