Bluepadजय जय स्वामी समर्थ....
Bluepad

जय जय स्वामी समर्थ....

डॉ अमित.
डॉ अमित.
23rd Jul, 2020

Share

जय जय स्वामी समर्थ....


स्वामी नाम घेता, होतो मी निःशंक
स्वामी रूप पाहता, होते जन्माचे सार्थक

स्वामी ध्यान मनी, देते सर्व सुख जीवनी
स्वामी ध्यास सदा, देते मज संजीवनी

स्वामी तुमचा विश्वासं, देतो जगण्या श्वासं
पाठीशी तुमची काया, जगणे करते खास

स्वामी तुमची छाया, राहुदे अशीच सोबती
तुमचा आशिष डोईवर, मज कशाची भीती

स्वामी तुमची श्रद्धा, दूर करते सर्व बाधा
स्वामी तुमचे गुणगान, देत राहील सुख-सुविधा

स्वामी तुमची भक्ती, देते सदैव मज शक्ती
स्वामी तुमची लीला, वाढवते अगाध भक्ती

स्वामी तुमची साथ, करील अशक्य ही शक्य
नको घाबरु संकटाला, खुलवतील स्वामी हास्यं

स्वामी तुमची माया, वटवृक्षा सम विशाल
काय वर्णावी महती तिची, जशी उबदार शाल

स्वामी चरित्र ऐकता, धन्य होते सारे जगणे
मना-मनात रुजले, स्वामी तुमचे प्रकट होणे.


डॉ अमित.
गुरुवार.

25 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad